Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर ( स्मॅक ) च्या सन २०२३ - २८ साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तेरा पैकी पाच जागा बिनविरोध.

 शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर ( स्मॅक ) च्या सन २०२३ - २८ साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तेरा पैकी पाच जागा बिनविरोध.

 जेष्ठ उद्योजक, ग्नॅट फाऊंड्रीचे सुरेन्द्र जैन हे मोठ्या उद्योग गटातून, 

झंवर उद्योग समूहाचे नीरज झंवर 

 चौगुले इंडस्ट्रीज चे 

सुरेश चौगुले

फाऊंड्री उद्योग गटातून, विद्यमान अध्यक्ष आरएपी इंडस्ट्रीजचे दिपक पाटील हे केमिकल व पेपर पॅकिंग उद्योग गटातून 

आणि चौगुले सिमेंट पाईपचे जयदीप चौगुले हे सिमेंट उद्योग गटातून बिनविरोध झाले आहेत. 

----------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------

उर्वरित त आठ जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये मशीन शाॅप गटातील पाच जागांसाठी सात उमेदवार आहेत. या गटातून आरएनडीचे राजू पाटील, देवजी इंडस्ट्रीजचे अतुल पाटील, अमर जाधव, प्रशांत शेळके, बदाम पाटील, निशिकांत खाडे व शरद तोतला, फॅब्रिकेशन व फोर्जिंग गटातील एका जागेसाठी रणजित जाधव व सचिन पाटील असे दोन उमेदवार अर्ज आहेत. तर इतर उद्योग गटातील दोन जागांसाठी सरोज ग्रुपचे भरत जाधव, शेखर कुसाळे व आनंदा पाटील असे तीन उमेदवारी अर्ज आहेत. 

शुक्रवार ( ता. २५ ) ते बुधवार ( ता. ३० ) उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. 

स्मॅक निवडणूकीसाठी त्रिसदस्यीय समिती काम पहात आहे. यामध्ये अॅड. अशोक उपाध्ये, हरिश्चंद्र धोत्रे व बाबासो कोंडेकर यांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments