Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भगतसिंग नवणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

 भगतसिंग नवणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

----------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

रोहन कांबळे

----------------------------------

तुळशी धामणी खोऱ्याचे भाग्यविधाते, हरित क्रांतिचे जनक, कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सह्याद्री सहकरी साखर कारखाना धामोडचे संस्थापक अध्यक्ष स्व. आण्णासाहेब शिवा नवणे यांचे नातू तसेच नवणे आण्णा दान फौंडेशन, धामोड चे संस्थापक भगतसिंग दिपसिंह नवणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला.नवने यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय चौक, शाहू स्मारक कोल्हापूर येथे १५ ऑगस्ट २०२३ रोजी अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमास मा.आमदार राजेश क्षीरसागर, बाजीराव फराकटे, एम.आर.तुरंबेकर, विजय तुरंबेकर, अजिंक्य जाधव, शेखर पाटील, वैभव पाटील, अवधुत कुंभार व अनेक विविध स्थरातील  मंडळी उपस्थित होते.

अनेकांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनी वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments