Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महसूल सप्ताहानिमित्त प्रांताधिकारी सुधाकर भोसले, मंडलाधिकारी जयंत जाधव व‌ तहसीलदार राजेश जाधव यांनी केले मार्गदर्शन.

 महसूल सप्ताहानिमित्त प्रांताधिकारी सुधाकर भोसले, मंडलाधिकारी जयंत जाधव व‌ तहसीलदार राजेश जाधव यांनी केले मार्गदर्शन.

--------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

किरण अडागळे .

--------------------------------------------

महसूल सप्ताहानिमित्त सातारा येथील करंजे येथील जनप्रसारक संस्थेच्या श्रीपतराव पाटील हायस्कूल मध्ये विविध शासकीय योजना बाबतीत माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली. यावेळी सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले, सातारा तहसीलदार राजेश जाधव व मंडलाधिकारी जयंत जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांनी शाळेच्या शिस्तीची , विविध उपक्रम तसेच वाद्य विभागाची स्तुती करून विद्यार्थ्यांनी क्रुतीशील सहभाग द्यावा असे आवाहन केले. प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी शासकीय उपक्रमाची माहिती देताना ई पीक पाहणी ‌, अठरा वर्षांवरील मुलामुलींना मतदान अधिकार, आपत्कालीन परिस्थितीत आपल्या सर्वांचे योगदान आणि जीवनातील यशात अभ्यासाबरोबरच खेळ आणि व्यायाम यांचे महत्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कोंडवे तलाठी शंभूराज ‌सपकाळ यांनी ईपीक पाहणी करताना घ्यावयाची काळजी आणि मोबाईलचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मंडलाधिकारी जयंत जाधव, तलाठी संदीप वणवे, संस्थेचे ‌सचिव तुषार पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत,व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments