अक्षय आनंदप्राप्तीसाठी नामस्मरण,निखळभक्तीची गरज : मनीष महाराज.
अक्षय आनंदप्राप्तीसाठी नामस्मरण,निखळभक्तीची गरज : मनीष महाराज.
-----------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------------------------------------
अखंड नामस्मरण आणि निखळ भक्तीतून अक्षय आनंद प्राप्त होत असल्याने परमेश्वराच्या चरणी प्रत्येकाने लीन असले पाहिजे, असा संदेश चालीहो उत्सवानिमित्त येथील जय शंकर आश्रमात आयोजित सत्संग सोहळ्यात मनीष महाराज यांनी दिला.
संकटात सापडलेल्या सिंधी बांधवांनी अखंड चाळीस दिवस उपवास, सत्संग, भजन, भक्तीगीत गायन केल्यानंतर सिंधू नदीच्या तीरावर सिंधी बांधवांचे आराध्य दैवत श्री झुलेलाल प्रकट झाले. म्हणून हा चालीहो उत्सव मोठ्या भक्तीभावाने सिंधू बांधव साजरा करतात. या उत्सवादरम्यान झालेल्या सत्संग सोहळ्यात मनीष महाराज पुढे म्हणाले की परमेश्वराला आर्त हाक दिल्यानंतर तो संकटाला धावून येतो आणि भक्ताचे रक्षण करतो. म्हणून प्रत्येकाने परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. संकट निवारणाचा तो एक राजमार्ग आहे.
सत्संग सोहळ्यासाठी रोज प्रवचन, किर्तन व पूजापाठकरिता भक्तांनी एकच गर्दी केली. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय राहिली.
Comments
Post a Comment