Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथे मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात.

 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथे मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात.

--------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

किरण अडागळे 

--------------------------------------------

 रविवार दिनांक‌ 20 ऑगस्ट रोजी सातारा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व क्रांतीसिंह नानासाहेब पाटील रुग्णालयाचे संयुक्त विद्यमाने खाजगी बस चालक व वाहन चालक यांच्या साठी मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सहाय्यक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे व सिव्हिल हॉस्पिटलचे नोडल ऑफिसर शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमात सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. रेश्मा गांधी, रूपाली कदम, इला ओतारी यांचा सत्कार करण्यात आला. परिवहन आयुक्त मुंबई यांच्या आदेशानुसार सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 वाहन चालवताना डोळे व आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा अपघात हे वाहन चालक यांच्या चुकीमुळे होतात. म्हणून वाहन चालक यांनी आपल्या आरोग्याची तपासणी व डोळे तपासणी करणे आवश्यक आहे, शासन स्तरावर शिबिरामध्ये तपासणी मध्ये ज्या चालकांना चष्मा गरजेचा आहे किंवा आणखी आरोग्य संदर्भात काही उपाययोजना राबविण्याच्या सुचना शासनाने केल्या आहेत व त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. आवश्यक चालकांना त्याचा लाभ निश्चित मिळेल तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सांगितले. या शिबिरास अखिल भारतीय चालक व मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी, वाहतूक समावेशक मधुकर शेंबडे, नोडल ऑफिसर शिंदे तसेच सहाय्यक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे, मोटार वाहन निरीक्षक रोकडे, ओतारी, गावडे मॅडम, साळुंखे मॅडम,काशिद मॅडम, संग्राम देवणे, राजेंद्र दराडे, जाधव, सुदर्शन गवळी, सचिन माळी, राहुल नायक, कोळेकर, खाडे मॅडम, सरोदे मॅडम, सतिश शिवणकर , अधिकारी व कर्मचारी तसेच वाहन चालक व मालक उपस्थित होते.‌सदर शिबिरात सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने कुष्ठरोग समुपदेशक सचिन जाधव, शुभांगी झांजुरणे,अनिकेत गावडे,इला ओतारी, डॉ. रेश्मा गांधी, अपर्णा खामकर यांनी नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी केली.


Post a Comment

0 Comments