Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सातारा जिल्ह्यातील जावली पंचायत समितीला राज्यात सर्व प्रथम ओडीएफ प्लस होण्याचा बहुमान.

 सातारा जिल्ह्यातील जावली पंचायत  समितीला राज्यात सर्व प्रथम ओडीएफ प्लस होण्याचा बहुमान. 

भणंग : सातारा जिल्ह्यातील जावली पंचायत समितीला राज्यात सर्व प्रथम ओडीएफ प्लस होण्याचा बहुमान प्राप्त झालेला असून जावली पंचायत समिती या विकास गटातील सर्व ग्रामपंचायती ह्या ओडिएफ प्लस म्हणून शासनाने घोषित केलेल्या आहेत काल स्वातंत्र्य दिनी याबाबत शासनाने जावली तालुक्याच्या नावाची घोषणा केल्यांनतर तालुक्यामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे तालुका ओडीएफ प्लस होण्याकामी जिल्हा परिषद सातारा चे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री. ज्ञानेश्वरजी खिलारी भा.प्र.से.,मा.श्रीमती क्रांती बोराटे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु व स्व.वि.) तसेच पंचायत समिती जावलीचे आदरणीय गटविकास अधिकारी माननीय श्री मनोज जी भोसले साहेब या सर्वांचे मार्गदर्शन पंचायत समितीला लाभले तसेच पंचायत विभागाचे सर्व विस्तार अधिकारी स्वच्छ भारत कक्षाकडील तालुका समन्वयक व गट समन्वयक श्री रमेश शिंदे व श्री संतोष जाधव तसेच सर्व ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकांनी या कामी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments