कास पठार रानफुलांनी बहरण्यासाठी अजून वेळ, पर्यटन शुल्क वाढले.

 कास पठार रानफुलांनी बहरण्यासाठी अजून वेळ, पर्यटन शुल्क वाढले.

  कास हा जैवविविधतेचा केंद्रबिंदू मानला जातो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत फुलणाऱ्या रानफुलांसाठी आणि विविध प्रकारच्या फुलपाखरांसाठी कास प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे १००० ते१२५० मी.आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.कि.मी. आहे.या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती आढळतात.

हे पठार जागतिक वारसास्थळ व विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या फुलांचा सडा बहरण्यास अजूनतरी अवधी असून, कासवर रानफुलांची उधळण १ सप्टेंबर नंतरच पाहायला मिळणार आहे.सध्या पठारावर चवर (रानहळद) पांढऱ्या रंगाची फुले.त्याचबरोबर आमरी फुलांचा बहर दिसतो आहे.

 पावसाचे प्रमाण कमी होऊन उन्हाची ताप पडण्यास सरुवात होत आहे याच्यामुळे नवीन फुले उमलण्यास मदत होईल.कास् पठारावर गतवर्षी १०० रुपये शुल्क आकारण्यात येत होते.परंतु या वर्षीसाठी पार्किंग शुल्क,पार्किंगवरून पठारावर येण्यासाठी असणाऱ्या बसचे शुल्क एकत्रीत प्रति व्यक्ती १५० रुपये आकारले जाणार आहे.याबाबतचा निर्णय नुकताच कास कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.सध्यातरी मंडप गुहा , भदारतल , हू पॉइंटसाठी पर्यटकांना पन्नास रुपये शुल्क आकारून प्रवेश दिला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.