Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गांधीनगर येथे स्वामी शांती प्रकाश महाराज जन्म जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

 गांधीनगर येथे स्वामी शांती प्रकाश महाराज जन्म जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

---------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

गांधीनगर प्रतिनिधी 

सतीश राजपूत

---------------------------------------------

गांधीनगर : सिंधी समाजाचे सर्वश्रेष्ठ संत स्वामी शांती प्रकाश जी महाराज यांच्या 117 व्या जन्म जयंती आणि 31 व्या वरशी उत्सवानिमित्त स्वामी प्रेमप्रकाश मंदिराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. रक्त संकलन करण्यासाठी सीपीआर रक्तपेढी, रोटरी क्लब रक्तपेढी आणि अर्पण रक्तपेढी, शाहू रक्तपेढी यांनी विशेष सहकार्य केले. पवित्र पुरुषोत्तम मासानिमित्त श्रद्धेय आचार्य श्री सर्व चैतन्य जी महाराज यांच्या अमोग वाणीतून श्रीमद्भगवत कथा वाचन सुरू आहे. या रक्तदान शिबिरामध्ये श्रद्धेय आचार्य श्री सर्व चैतन्य जी महाराज आणि त्यांच्या सहकार्याने रक्तदान करून रक्तदान शिबिराची सुरुवात केली. दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रेमप्रकाश मंदिरामध्ये भजन आणि कीर्तन कार्यक्रम संपन्न होत आहेत. 14 ऑगस्ट रोजी भजन रसधारा मनीष बोधवानिजी यांची भजन संध्या कार्यक्रम प्रेमप्रकाश मंदिरामध्ये होणार आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वामी सर्वानंद स्कूलचे विद्यार्थी सकाळी सात वाजता गांधीनगर शहरातून रॅली काढणार असून सकाळी आठ ते दहा या वेळेत 160 वा मनवांचीत दिन तसेच साई रमेश प्रकाशजी महाराज यांचा सत्संग आणि सायंकाळी स्वामी शांती प्रकाश जी महाराज यांचा ११७ वा जन्म जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.या रक्तदान शिबिरात प्रसंगी स्वामी प्रेमप्रकाश मंदिराचे अध्यक्ष बलराम सावलानी, अशोक संतांनी महाराज, होलसेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक टेल्यानी,सर्व ग्रामपंचायत सदस्य,मंदिराचे सर्व सेवाधारी, भारतीय सिंधू सभेचे पदाधिकारी, सिंधी समाजाचे भाविक, व्यापारी, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज झालेल्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये जवळपास 440 रक्तदात्यांनी रक्तदान चळवळीमध्ये सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments