Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उचगावात तरुणावर चाकूने वार एकजण गंभीर जखमी.

 उचगावात तरुणावर चाकूने वार एकजण गंभीर जखमी.

गांधीनगर :-मंडळाने आणलेल्या नवीन स्टिरिओ सिस्टीमची माहिती राजू प्रदीप सातपुते (वय २६, रा. शाहू मिल कॉलनी, रेल्वे लाईन जवळ, उचगाव) हे मंडळातील मुलांना विचारत असताना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या पोटावर व पाठीवर सचिन दीपक पाटील (वय २७, उचगाव) याने चाकूने वार करून जखमी केले. हा प्रकार मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास उचगाव ता. करवीर  येथे झाला. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सचिन पाटील याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. 

याबाबतची  फिर्याद राजू सातपुते  दिली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी

उचगाव येथील एका मंडळाने आणलेल्या स्टेरिओ सिस्टीमची माहिती राजू सातपुते मुलांना विचारत होते. दरम्यान तिथे असलेल्या सचिन पाटील याने जीवे मारण्याची धमकी देत सातपुते यांच्या पोटावर व पाठीवर चाकूने वार केले. त्यात ते जखमी झाले. याबाबत गुन्हा नोंद झाला असून सचिन पाटील याला पोलिसांनी अटक करून त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्याला दि .11 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात करत आहेत.

Post a Comment

0 Comments