Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महालक्ष्मी चेंबर्स मधील बारा मोबाईल शॉपी सील परवाना विभागाची कारवाई..

महालक्ष्मी चेंबर्स मधील बारा मोबाईल शॉपी सील परवाना विभागाची कारवाई..

---------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

 आज कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वतीने श्री. महालक्ष्मी चेंबर्स एस.टी. स्टँड समोर या ठिकाणी विनापरवाना व्यवसाय करत असलेल्या बारा दुकानांना सील करण्यात आले. या कारवाईमुळे महालक्ष्मी चेंबर्स मध्ये एकच खळबळ उडाली होती.

 कोल्हापूर महानगरपालिका परवाना विभागामार्फत विविध व्यवसायांना परवाना घेणे बंधनकारक असताना, काही व्यवसायिक महानगरपालिकेचा लाखो रुपयाचा महसूल बुडवून विनापरवाना विविध व्यवसाय करत असल्याचे पत्रकारांच्या निदर्शनास आल्यानंतर, पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि रीतसर तक्रार दिल्यानंतर परवाना विभागाने आज महालक्ष्मी चेंबर्स मधील बेसमेंट मध्ये सुरू असलेले विविध मोबाईल्स शॉपी यांच्यावर कारवाई करत तब्बल 12 दुकानांना सील केले आहे. या महालक्ष्मी चेंबर्स मधील वरील मजल्यावर अजून पर्यंत परवाना विभाग कारवाईसाठी गेला नाही. मात्र येणाऱ्या काळात या चेंबर्स मधील गेले कित्येक वर्षे सुरू असलेले विनापरवाना हॉटेल लॉजिंग आणि यात्रेनिवास लवकरच सील केले जातील असे सांगण्यात येत आहे. जर एका महालक्ष्मी चेंबर्स मध्ये बेसमेंट मध्येच 12 व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे एका दिवसाच्या कारवाईत समोर येत असेल तर, परवाना विभागाने मनावर घेतल्यास एका महिन्यात महानगरपालिकेच्या तिजोरीत लाखो रुपयांची भर पडल्याशिवाय राहणार नाही. अशी चर्चा सर्वसामान्यातून होत आहे. नूतन अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी जर परवाना विभागाला आणि त्यांच्या कारभाराला वळण लावले, तर त्यांची कारकीर्दी कोल्हापूरकर कधीच विसरणार नाहीत.

Post a Comment

0 Comments