Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मिलिट्री अपशिंगेत मेरी मिट्टी मेरा देश.

 मिलिट्री अपशिंगेत मेरी मिट्टी मेरा देश.

सातारा:मेरी मिट्टी ,मेरा देश या कार्यक्रमअंतर्गत अपशिंगे मिलिटरी येथे ग्रामपंचायत तर्फे ध्वजारोहण व स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये देशाच्या रक्षणासठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर योध्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच श्री तुषार निकम यांनी केले व सर्व ग्रा . प. सदस्य आणि  ग्रामपंचायीमार्फत या देशसेवा करणाऱ्या जवाना प्रती सन्मान  करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रिगेडयर मोहन निकम यांच्या हस्ते प्रथम शहिदांना पुष्पचक्रअर्पण केले. व ध्वजारोहण केले. सैनिक सहकारी बँकेचे अध्यक्ष कॅप्टन उदाजी निकम यांनीही पुष्पचक्र अर्पण केले. या कार्यक्रमात गावातील सर्व संस्था, मंडळे, शाळेतील मुले व शिक्षक, समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. मुलांनी राष्ट्रभक्ती पर गीते सादर केली. या प्रसंगी कमांडंट तानाजी पवार, डॉ. राजेंद्र मोरे, सातारा तालुक्याचे बी डी ओ श्री वाघमारे आवर्जून उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्योत्तर काळात 1948 ते 1999 दरम्यानच्या काळात शहिदांच्या वीरमाता, वीरपत्नी व वीर योद्धा यांचा मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचयतीतर्फे सन्मान पत्र व पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दिल्लीतील शहीद स्मारकांसाठी देशातील सर्व गावातील माती संकलित करण्यात येत आहे म्हणून   गावातील माती सर्वांच्या शुभहस्ते कलशात भरण्यात आली. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे मत कॅप्टन उदाजी निकम यांनी व्यक्त केले. गावात नवीन झालेल्या अग्नीवीर ट्रेनिंग सेंटर चा सर्व मुलामुलींनी लाभ घेऊन सैनिकी परंपरा अशीच अजून सक्षमतेने पुढे नेण्यासाठी आवाहन ब्रिगेडयर मोहन निकम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजेंद्र मोरे व  हेमंत निकम यांनी केले व श्री सतीश निकम यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments