Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नाजीम खान यांचा व्हाइस ऑफ मिडिया तर्फे सत्कार.

 नाजीम खान यांचा व्हाइस ऑफ मिडिया तर्फे सत्कार.

--------------------------------------

रिसोड प्रतिनिधी 
रणजित ठाकूर

--------------------------------------

रिसोड : येथील युवा पत्रकार नाजीम खान यांची मुस्लिम सेवा संघ च्या रिसोड शहर अध्यक्षपदी निवड झालेली आहे. या अनुषंगाने व्हाईस ऑफ मीडिया रिसोड तालुका तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. दिनांक 12 ऑगस्ट रोजी येथील पत्रकार कार्यालयात सत्कार प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार अनंत भालेराव हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये विवेकानंद ठाकरे,संतोष चराटे,महादेवराव घुगे मंचावर उपस्थित होते. मंचावर उपस्थित मान्यवरांनी नाजिम खान यांचा शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार सन्मान केला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत खान यांच्या नियुक्तीचे व कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन रुपेश बाजड यांनी तर आभार प्रदर्शन महेंद्र महाजन यांनी केले. यावेळी कार्यक्रमात,अर्जुन खरात केंद्रीय सदस्य,शेख अन्सारोद्दीन तालुका उपाध्यक्ष, सुरेश गिरी, , ,अनिकेत खरात, रणजितसिंह ठाकूर,ताराचंद वर्मा, कानडे आदी व्हाईस ऑफ मिडीयाचे सदस्य उपस्थित होते

Post a Comment

0 Comments