Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

किसन वीर महाविद्यालयात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन संपन्न.

 किसन वीर महाविद्यालयात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन संपन्न.  

--------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे

--------------------------------------------

 वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयांमध्ये दिनांक 10 ऑगस्ट ते दिनांक 12 ऑगस्ट 2023 दरम्यान भव्य शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या हस्ते झाले.  स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून अनेक शूरवीर मावळ्यांनी आपले बहुमोल योगदान देताना ज्या शस्त्रास्त्रांचा वापर केला त्यातील काही शस्त्रास्त्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. "या प्रदर्शनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. त्या अनुषंगाने विद्यार्थी विद्यार्थिनींनी या प्रदर्शनातील शस्त्रास्त्रांची माहिती घेवून आपला इतिहास जाणून घेण्याचे आवाहन  प्रदर्शनाचे उद्घाटक प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले. 

याप्रसंगी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे संग्राहक, भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य श्री प्रसाद बनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या शस्त्रास्त्रांची निर्मिती, वापर, त्यासाठी वापरलेला धातू, त्यांचे निर्माते कारागीर, इत्यादी माहिती उपस्थितांना दिली. हे प्रदर्शन श्री. प्रसाद बनकर, श्री. विवेक सुपेकर, कॅप्टन डॉ. समीर पवार यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील  एन.सी.सी. विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच वाई तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी  या प्रदर्शनाचा लाभ घेतला. 

या प्रदर्शनात वाघ नखे, धनुष्यबाण, तलवारी, चिलखत,भाले, कट्यार, जांभिया, खंजीर ,बिचवे, गुर्ज, तोफांचे गोळे, दांडपट्टा, यासारख्या शस्त्रांचे विविध प्रकार एकाच ठिकाणी पाहता यावे हा प्रमुख उद्देश ठेवून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.मदनदादा भोसले यांनी प्रदर्शनास भेट देऊन या शस्त्रास्त्रांचे संकलक श्री. प्रसाद बनकर यांचेकडून सविस्तर माहिती घेतली आणि या प्रदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले. या शस्त्रास्त्रांची माहिती वाई आणि वाई पंचक्रोशीतील शाळांच्या विद्यार्थ्यांनी घ्यावी यासाठी प्रयत्न करणेची सूचना केली. त्याप्रमाणे वाईमधील सर्व शाळांना कळवून विद्यार्थ्यांना प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यास अनुसरून वाई आणि पाचवड येथील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देऊन माहिती घेतली.

संस्थेचे सचिव डॉ.जयवंत चौधरी, खजिनदार प्रा.नारायण चौधरी यांनीही प्रदर्शनास विशेष भेट देऊन माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. कॅ. डॉ. समीर पवार प्रा. विवेक सुपेकर, डॉ.संग्राम थोरात, श्री जितेंद्र चव्हाण,प्रा. मनोज शिंदे, श्री. गजानन जाधव, श्री. दत्ता काळे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, सेवक व विद्यार्थी, एन.सी.सी छात्र, एन.एस.एस. चे स्वयंसेवक, आणि पाचवड येथील ग्रामस्थ, इतिहास प्रेमी, बहुसंख्येने उपस्थित होते. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विवेक सुपेकर, कॅ.डॉ.समीर पवार, श्री जितेंद्र चव्हाण एन.सी.सी सीनियर्स ओंकार थोरवे,प्रणय ढेकाणे, ओंकार जाधव, पायल गायकवाड आणि सेजल मांढरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments