Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

चोरी करण्यासाठी शासकीय महिलेवर हल्ला करणाऱ्या चार सराईत महिला अटक.

 चोरी करण्यासाठी शासकीय महिलेवर हल्ला करणाऱ्या चार सराईत महिला अटक.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा विभाग प्रतिनिधी 

अमर इंदलकर

-----------------------------------

सातारा: अजंठा चौक येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयच्या परिसरातील लोखंडी साहित्य हे 4 अनोळखी महिला चोरी करून घेऊन जात असल्याचे दिनांक 11/08/2023 रोजी दुपारी 1.15 वा. तेथील स्टाफ अधिकारी यांचे निदर्शनास आले होते. स्टाफ ने विरोध केला असता सदर महिलांनी वाद विवाद घालून शिवीगाळ करून सहाय्यक अभियंता श्रीमती मनीषा तुषार जगताप यांना हाताने मारहान करून त्या महिला साहित्य चोरून घेऊन पळून गेल्या होत्या. त्या बाबत मनीषा तुषार जगताप यांनी सातारा शहर पोलीस ठाणेत सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करून चोरी केलेबाबत फिर्याद दिलेली होती. मा.पोलीस पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. किरण कुमार सूर्यवंशी, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री धनंजय फडतरे, यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उप निरीक्षक श्री सुधीर मोरे, पो हवा. सुजीत भोसले, पो.ना. निलेश जाधव,पंकज मोहिते यांनी सर्व तपास करून सदर आरोपी महिला (1) माया दीपक खुडे(2)सुशीला सुखदेव वाघमारे (3) काशीबाई पापा गवळी (4) रेखा राजू कांबळे. सर्व राहणार प्रतापसिंह नगर सातारा.यांना ताब्यात घेऊन कर्तव्य दक्ष कामगिरी बजावली.

Post a Comment

0 Comments