Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कावड यात्रेचे जल्लोषात स्वागत.

 कावड यात्रेचे जल्लोषात स्वागत.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजित ठाकुर 

-----------------------------------

येथील संकट मोचन व नवरंग मित्र मंडळ कावड यात्राचे आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी रिसोड शहरात आगमनाप्रसंगी जल्लोषात स्वागत करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथून सदर कावड यात्रा आज सकाळी सहा वाजता निघाली असता संध्याकाळी सहाला रिसोड शहरात त्याचे आगमन झाले. आगमनापूर्वी भक्तांनी कावड यात्रेच्या स्वागतासाठी तयारी केली होती. फटाक्याची आतिषबाजी डीजेच्या तालावर कावड यात्रेचे स्वागत सत्कार करण्यात आले.कावड यात्रा रिसोड शहरातील लोणी फाटा, भाजी मंडी, डॉक्टर आंबेडकर चौक, नवीन सराफा लाईन, चांदणी चौक, जुनी सराफा लाईन, अष्टभुजा देवी चौक, आसन गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने होत नवीन सराफा लाईन येथे कावड यात्रेचे समापन झाले. यादरम्यान लोणार येथून आणलेले जलने शहरातील शिव मंदिराचा जलाभिषेक करण्यात आला. कावड यात्रेत मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments