Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे व सपोनि बापुसो ‌जाधव रंगेहाथ लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

 पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे व सपोनि बापुसो ‌जाधव रंगेहाथ लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

तक्रारदार यांचे परमिट रूम असून परमिट रूम मधुन दारुची अवैध विक्री प्रकरणी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास औंध पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे व सपोनि बापुसो नारायण जाधव यांच्या कडे होता. सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना त्यांच्या व्यवसायात मदत करणेसाठी व इथून पुढे कोणत्याही प्रकारचा त्रास होवू देणार नाही म्हणून पोलिस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे व सपोनि बापुसो नारायण जाधव यांनी तक्रारदार यांना 150000 रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती तक्रारदार यांनी 100000रूपये देण्याचे मान्य केले व याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा विभागाकडे तक्रार दिली . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक 11 ऑगस्ट रोजी पडताळणी केली.व सापळा लावला. दिनांक 11 ऑगस्ट रोजी जुना एसटी स्टँड, बाजार पटांगण, औंध येथे औंध पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे,वय 42व सपोनि बापुसो नारायण जाधव,वय 54 यांना 100000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा पथकाने रंगेहाथ पकडले. सदर कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, पुणे व श्रीमती शितल जानवे-खराडे , अप्पर पोलीस अधीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उप अधीक्षक उज्वल वैद्य, पोलिस निलेश नाईक, तुषार भोसले, निलेश येवले यांनी केली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जर आपणास शासकीय/ निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी काम करण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त जादा पैसे मागितले तर तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा , फोन नंबर 9823231244/02162-238139 या नंबरवर फोन करावा किंवा टोल फ्री क्रमांक 1064वर संपर्क साधावा.

Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

(600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

(1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

 (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील.

Post a Comment

0 Comments