Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूरात अवैध गांजा विक्री करणाऱ्यांवर मोक्काअंतर्गत करावाई करा.

 कोल्हापूरात अवैध गांजा विक्री करणाऱ्यांवर मोक्काअंतर्गत करावाई करा.

----------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी 
रोहन कांबळे
----------------------------

कोल्हापूर युवासेना जिल्हा व शहर (शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष )यांची मागणी.

कोल्हापूर शहर व जिल्ह्या मध्ये गांजाचा सुळसुळाट वाढला आहे...

गांजा विक्री व तस्करी करणारे लोक फार मोठया प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये आले आहेत. हा गांजा कर्नाटक व सांगली जिल्ह्यातुन आयात केला जातो.आज बघितल तर शहरातील आणि जिल्ह्यातील तरुण पिढी बरबाद होत चालली आहे. आणि उमेदीच्या काळात संपत चालली आहे. कोल्हापूर शहरांत बघितलं तर,अनुककामेनिका मंदिर रंकाळा, पेटाळा, गांधी मैदान, इराणी खन रंकाळा आजूबाजूचा परिसर, शिवाजी स्टेडियम प्रेक्षक गॅरली, यादव नगर आय.आर.बी जुनी बिल्डिंग, हुतात्मा पार्क, पद्मावती गार्डन मंगळवार पेठ ही गांजा ओढण्याची संशयास्पद ठिकाणे आहेत.

 सांगली जिल्हा व कर्नाटक परिसरातुन ज्या ठिकाणातुन गांजा येतो तिथे एक तपासणी नाका बसवण्यात यावे.

तसेच यात जे जे लोक सापडतील त्यांच्यावर मोक्काअंतर्गत करावाई करावी. तसेच जी मुले गांजा च्या आदिन झाली आहेत, त्यांचे प्रबोधन करावे.अश्या मागणीचे निवेदन आज शहर डी. वाय.एस.पी अजित टिके यांच्याकडे देण्यात आले.यावेळी त्यांनी संपर्काचा टोल फ्री क्रमांक देऊन अश्यांच्या लवकरच मुसक्या आवळू असे आश्वासन दिले.

यावेळी उपस्थित जिल्हा युवा अधिकारी मंजित माने,जिल्हा चिटणीस, अमित बाबर, शहर युवा अधिकारी संतोष कांदेकर, चैतन्य देशपांडे, सुनील कानूरकर, श्वेता सुतार, प्रतीक भोसले,रघुनाथ भावे, रोहित वेढे,अक्षय घाटगे,प्रथमेश देशिंगे, प्रिया माने, राजेश्री मिणचेकर,फिरोज मुल्लानी,सानिका दामूगडे,माधुरी जाधव,सिद्धी दामूगडे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments