Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

एक रात्र माझ्या सोबत ये म्हणत मैत्रीणीचा विनयभंग, केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

 एक रात्र माझ्या सोबत ये म्हणत मैत्रीणीचा विनयभंग, केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या कडून फोटो घेउन नंतर फेक आयडी वरून तेच फोटो पाठवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी संग्राम संजय चव्हाण,वय 25, राहणार एकंबे तालुका कोरेगाव याच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना डिसेंबर 2020 ते  ऑगस्ट 2023 या कालावधीत घडली आहे. तक्रारदार युवती व संशयित संग्राम संजय चव्हाण हे एकमेकांना ओळखत होते. संशयिताने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे फोटो घेतले. यानंतर त्या फोटोच्या आधारे संशयिताने युवतीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. यानंतर संशयित याने फेक आयडी वरून युवतीला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच संशयितांने तसे न करण्यासाठी 1 लाख रुपये व 1 रात्र संशयितासोबत येण्यासाठी सांगुन विनयभंग केला त्यामुळे युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत

Post a Comment

0 Comments