Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

व्हिडिओ चित्रीकरण करण्यास मज्जाव केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी व अंगरक्षक यांची चौकशी सुरू.

 व्हिडिओ चित्रीकरण करण्यास मज्जाव केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी व अंगरक्षक यांची  चौकशी सुरू.

दिनांक ३१ जुलै २०२३ ‌रोजी सातारा जिल्हा परिषद येथे एका विद्यालयातील मोर्चाचे चित्रीकरण करत असताना सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी व अंगरक्षक पोलिस लाड यांनी दैनिक सुपर भारत व फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र चे सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पत्रकार हा गर्दीचा भाग नाही. या चित्रीकरणामुळे जिल्हा परिषदेचा‌ भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.या घटनेची माहिती अशी की वाखरी ता फलटण या गावांतील शाळेची इमारत मोडकळीस आली आहे हि इमारत 25 वर्षांपूर्वीची असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणून हा मोर्चा शिक्षकांच्या सह विद्यार्थी यासह न्यायिक मागणी साठी आलेल्या मोर्चा चे चित्रीकरण करत असताना हा प्रकार घडला बातमीसाठी चित्रीकरण करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांचा विरोध का?‌हा विषय महत्त्वाचा आहे या मागचे गुपीत का ? असा सवाल सातारा मधील नागरिकांना पडला आहे .

घडलेल्या प्रकाराबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व मुख्यमंत्री कक्षाकडे खिलारी यांची चौकशी करण्यासाठी मागणी करण्यात आली होती यावर प्रशासन तातडीने कारवाई करीत असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments