Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कृषी महाविद्यालय आमखेडा येथील कृषी दुतांनी शेतकऱ्यांना केले बीज प्रक्रियेचे मार्गदर्शन.

 कृषी महाविद्यालय आमखेडा येथील कृषी दुतांनी शेतकऱ्यांना केले बीज प्रक्रियेचे मार्गदर्शन.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर

--------------------------------------

आजकाल शेतकरी बीज पेरल्यानंतर उगवत नाही,पीक लहान असता वेळेस त्याचे मुळे कुजून जातात, बियाण्यांना कीड लागते अशा खूप समस्यांना बळी पडत आहेत यावर एकमेव आणि स्वस्त उपाय म्हणजे बीजप्रक्रिया. बीजप्रक्रिया केल्यामुळे मुळ कुजने आणि मर रोग इत्यादीचा प्रादुर्भाव टाळता येतो, बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, रोप सतेज व जोमदारपणे वाढतात, पिकाच्या उत्पादनात वाढ होते आणि बीज प्रक्रियेसाठी कमी खर्च येतो त्यामुळे ही कीड आणि रोग नियंत्रणाची किफायतशीर पद्धत आहे. शेतकरी पुत्र राखी दादाराव लांडगे, मनोज दिनकर सुर्वे, अब्दुल रहमान कलीम खान, श्रीकांत शेषराव सोनोने आणि रोशन संतोष बेलखेडे हे कृषी महाविद्यालय आमखेडा येथील विद्यार्थी, यांनी आमखेडा या गावामधील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बीज प्रक्रियेवरील फायदे आणि पद्धत याबद्दलची सर्व माहिती प्रदान केली त्यामध्ये शेतकरी गजानन जोगदंड, नवनाथ आवटे, किसन जोगदंड, सुरेश रामभाऊ जोगदंड, विठ्ठल पोफळे, अजय जोगदंड, संतोष शिंदे, प्रकाश जोगदंड, डॉ.वैभव सुरेश जोगदंड, ईश्वर पुंडलिक जगताप आणि नितीन संजय जोगदंड या सर्व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालय आमखेडा येथील प्राचार्य डॉ.एस.ए.काळे, डॉ.आर.के. करंगामी (कार्यक्रम समन्वयक), प्रा. एस.टी.जाधव (कार्यक्रम अधिकारी) व तसेच विशेषतज्ञ प्रा. प्रदीप टी. निचळ आणि प्रा.ए.के.वाघ,मा.श्री. नंदकिशोर काळे (जनसंपर्क अधिकारी) यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

Post a Comment

0 Comments