येत्या काळात पत्रकारांनी आग्रही असावे आजच्या काळात भर देण्याची गरज, विद्यापीठातील पत्रकार कार्यशाळेत डॉ. निरगुडकर यांची .प्रतिपादन.

 येत्या काळात पत्रकारांनी आग्रही असावे आजच्या काळात भर देण्याची गरज, विद्यापीठातील पत्रकार कार्यशाळेत डॉ. निरगुडकर यांची .प्रतिपादन.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

पी.एन.देशमुख 

अमरावती प्रतिनिधी

--------------------------------------

अमरावती:-हल्ली प्रसार माध्यमांमध्ये आशाय कमी आणि व्यवसाय प्रधानता अधिक असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे माध्यमांचा आत्मा असलेले विश्वासाह्राता डावावर लागली असून ती पूर्ववत मिळविण्यासाठी माध्यमांमध्ये आशाये प्रधांता येणे गरजेचे आहे. त्यासाठी या काळातील पत्रकारांनी आग्रही असावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ च्या डॉ केजी देशमुख सभागृहात आज, आजची पत्रकारिता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे बीजभाषक म्हणून ते बोलत होते. विद्यापीठ चा जनसंपर्क विभाग, अमरावती श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आयोजन करण्यात आले. आणि विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते. तर इतर वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार येतो जोशी, प्रेस कॅन्सल ऑफ इंडियाचे माजी सदस्य तथा यशदाचे संचालक राजीव साबळे, कुल सचिव डॉ तुषार देशमुख, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, श्रमिक पत्रकार संघाचेअध्यक्ष गोपाळ हरणे, विद्यापीठ अधिसभा सदस्य गिरीश शेरेकर, व जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर उपस्थित डॉक्टर निरगुडकर पुढे म्हणाले सध्या माध्यम क्षेत्राला वेगवेगळ्या कौशल्याचा समुच्चय असणाऱ्या मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे पत्रकारांनाही ती कौशल्य आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे एकाकी वेळी वेगवेगळ्या माध्यमांची तोंड ओळख असणारे किंवा त्यात विपुल ठरणारे पत्रकार यापुढे टिकू शकतील. किंबहुन त्या टिकण्यासाठी आपण सर्वांनी स्वतःला तयार केले पाहिजे. विषयाची मांडणी करताना त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. सोशल मीडिया व प्रसार माध्यमे या विषयावर बोलताना येदु जोशी या विषयावर बोलताना पत्रकारिता क्षेत्रात खूप खाच खळगे आहे. बोलणे आणि प्रत्यक्ष काम करणे यात खूप फरक आहे. या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांना सूचना करताना ते म्हणाले गॅम्बलर म्हणून तर आपण पत्रकारिता क्षेत्रात उतरत असतात तर दूरच रहा. मात्र पत्रकारिता क्षेत्र इतके सुंदर आहे, की तुम्ही जे मिळवला त्याचे पैशात किंमत देखील मोजता येणार नाही. पत्रकारिता हा थोर वसा आपल्या ते राजू साबळे यांनी सांगितले. थोर वसा नोबेल प्रोफेशनल असा उल्लेख केला जाणाऱ्या पत्रकारितेचा आज व्यावसायिकरण झाले आहे. वृत्तपत्रासमोर मोठी आव्हाने उभी झाली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एक कालच्या काढून समाज जागृती केली. आज शहरी व ग्रामीण असे दोन भाग झाले आहेत. मात्र शहरी भागांना ग्रामीण भागाची माहिती नसते. जिल्हा व तालुका स्तरावर नियतकालिके काढून समाज जागृती केली, मात्र शहरी भागांना ग्रामीण भागातील माहिती नसते. जिल्हा व तालुका स्तरावर वृत्तपत्र साप्ताहिक सुरू झाल्याने ग्रामीण भागातील समस्या पुढे येऊ लागल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.