Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तर राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा नोंदवा....वंचित पक्ष प्रमुख प्रकाश आंबेडकर.

 तर राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा नोंदवा....वंचित पक्ष प्रमुख प्रकाश आंबेडकर.

पुणे :-सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर दहा दिवसात गुन्हे दाखल करावेत हे गुन्हे दाखल झाले नाहीत,तर पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी ब्लॅकमेल करण्यासाठी आरोप केले असे म्हणावं लागेल, असे असेल तर पंतप्रधानाणी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसची माफी मागावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली.

दहा दिवसात गुन्हे दाखल झाले नाहीत किंवा पंतप्रधानांनी माफी मागितली नाही, तर त्यांचा खोटारडेपणा देशासमोर

 आणण्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करू अशा इशारा आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

पुढे आंबेडकर म्हणाले कि,मोदी यांनी सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्यावर केले.ज्या पदतीने पंतप्रधान यांनी आरोप केलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती त्यांना प्राप्त असे तेव्हाच त्यांनी हा आरोप केला आहे.परंतु अद्याप काहीच झालेले नाही.

Post a Comment

0 Comments