Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

धम्मसेवक दत्तात्रय कांबळे यांचा वाढदिवस हर्षोल्लासात साजरा.

 धम्मसेवक दत्तात्रय कांबळे यांचा वाढदिवस हर्षोल्लासात साजरा.

दिघा :धम्मसेवक दत्तात्रय कांबळे यांचा वाढदिवस दिघा येथील विष्णूनागरामध्ये साजरा आला . दत्तात्रय कांबळे यांनी आपल्या वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होऊ नये म्हणून आपल्या मित्रांना फटाके वाजवू नये म्हणून विनंती केली. आपल्या वाढदिवसानिमित्त आपला आनंद इतरांसोबत साजरा करण्यासाठी वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटून साजरा केला. तसेच वाढदिवसानिमित्त झाड लावून त्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडली. त्यानंतर नालंदा बुद्ध विहारात साप्ताहिक वंदनेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर तिथे वाढदिवसानिमित्त बिस्किटे वाटप करण्यात आली. पूज्य भंते व भारतीय बौद्ध महासभेचे त्यांचे सहकारी यांनी त्यांना आशिर्वाद दिला. त्यानंतर कुलदीप कांबळे, बौद्धाचार्य  रूपेश दिवे यांनी जयभीम स्तंभ हनुमान चौकात त्यांच्यासाठी खास नामांकित शेफ कडून केक बनवून आणला होता. या वेळी वैभव बलांडे, भारत दावणे,  शिवा जैस्वाल,सम्राट सोनकांबळे, सुनिल गुप्ता, शुभम माली, उपस्थित होते. तर राजकीय क्षेत्रातील अजित दावणे, मारोती नारायणकर, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments