Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्टंटबाजी करणाऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल.

 सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्टंटबाजी करणाऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल.

सातारा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात काही युवकांनी थेट दारुच्या नशेत धमकी देऊन धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.  याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,काही युवकांनी थेट प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रवेश करत  मुख्य लेखापाल सतीश शिवणकर काम करीत असताना एजंट हुमायून तांबोळी याने दारु प्यायलेल्या अवस्थेत त्यांना शिवीगाळ करून खोटे आरोप करत कागदपत्रे अंगावर टाकली व शासकीय कामात अडथळा निर्माण करुन स्टंटबाजी केली ,सदर घटना घडत असताना नियोजन पद्धतीने व्हिडिओ तयार करून यांमध्ये काटछाट करून सोशल मीडिया वर व्हायरल करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाची बदनामी केली. याबाबत अधिक माहिती अशी की, सीसीटीव्ही फुटेजमधुन एजंट हुमायून तांबोळी याने कार्यालयातील काही महत्वाची कागदपत्रे चोरल्याचे निदर्शनास आले. अंतिम दस्त ऐवज चोरल्याचे  व्हिडिओ मध्ये दिसत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाची बदनामी सोशल मीडिया वर केल्याने याबाबत मुख्य लेखापाल सतीश शिवणकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून  या प्रकरणात स्टंटबाजी करणाऱ्या एजंट हुमायून तांबोळी, त्याचा हस्तक पाटखळ येथील एजंट संतोष शिंदे, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारा भोसले,व सोशल मीडिया वर व्हायरल करणारे अज्ञातावर कलम 353,380,500,504,506,332,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत .सदर घटना घडल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. याबाबत पोलीस नेमकी काय कारवाई करणार ही उत्सुकता आहे

Post a Comment

0 Comments