Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खरा खुनी शोधण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन सादर.

 डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खरा खुनी शोधण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन सादर.

20 ऑगस्ट 2023 रोजी  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दहा वर्षे पूर्ण झाली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 रोजी विरेंद्र तावडे, ऑगस्ट 2018, मध्ये शरद कळसकर व सचिन अंदुरे व मे 2019 मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून आरोपपत्र दाखल केले आहे. या खुनाचा तपास विरेंद्र तावडे या नावा पर्यंत येऊन थांबला आहे. या खुनामागिल खरा सुत्रधार अद्याप सापडलेला नाही.  डॉ. नरेंद्र दाभोलकर,काॅ.गोविंद पानसरे,प्रा. कलबुरगी व गौरी लोकेश या चारही खुनांचे एकमेकांत धागेदोरे गुंतलेले आहेत. या गुन्ह्यातील काही संशयित  आरोपी समान आहेत. तसेच दोन समान शस्त्र या चार खुनामधे वापरली आहेत. ब़ंगलोरमधील न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत अहवालानुसार डॉ. नरेंद्र दाभोलकर व काॅ गोविंद पानसरे यांच्या वर एकाच बंदुकीतून गोळ्या झाडल्या आहेत. न्यायालयाने दाखल केलेल्या शस्त्र विषयक अहवालानुसार कॉ. पानसरे यांच्या खुनासाठी देखील वापरलेले पिस्तुल प्रा. कलबुरगी व  गौरी लंकेश यांच्या खुनासाठी वापरली आहे. या चारही खुनांचे संदर्भात शेवटची अटक जानेवारी 2020 मध्ये झाली आहे. कर्नाटक एसटीआय ने झारखंड या राज्यातुन रुषिकेश देवडीकर या गौरी लंकेश यांच्या खुनातील संशयित आरोपीला अटक केली आहे. तो तेथे पेट्रोल पंपावर काम करीत होता. यावरून खुश करणार्या गटाच्या यंत्रणेने किती दुरवर हात पसरले आहेत हे सिद्ध होते. सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात असे म्हटले आहे की, सदर खुनाचा तपास करताना या प्रकरणातील संशयित आरोपीचा काॅ गोविंद पानसरे, प्रा कलबुरगी व गौरी लंकेश यांच्या खुनाशी असलेला संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. व त्या अनुषंगाने हे स्पष्ट होते की, फक्त खुनाची घटना नसुन हे दहशतवादी कारस्थान आहे.व त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना unlawful Activities prevention Act1976 हा कायदा लावला आहे. तरी या खुनामागिल खरा सुत्रधार कोण आहे हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे अन्यथा विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते व पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही व म्हणून या मुख्य सुत्रधार लवकरात लवकर शोधून अटक करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांनी केली आहे. निवेदन देताना प्रा. सौ. कुमुदिनी मंडपे, कुमार मंडपे, हौसेराव धुमाळ, डॉ दिपक माने, वंदना माने. शशिकांत सुतार, पत्रकार अनिल वीर,प्रदिप झनकर, वसंत धउऐ, उदय चव्हाण, मानसिंग मोरे, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments