Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गोकुळ हॉटेल समोरील वेश्याव्यवसाय करणाऱ्या तिघांना अटक शहरवासी मधून अनोखी प्रतिक्रिया , अखेर शाहूपुरी चे घोडे गंगेत नहाले!!

 गोकुळ हॉटेल समोरील वेश्याव्यवसाय करणाऱ्या तिघांना अटक शहरवासी मधून अनोखी प्रतिक्रिया , अखेर शाहूपुरी चे घोडे गंगेत नहाले!!

--------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------

आज शाहूपुरी पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात बिंदिकतपणे सुरू असलेला कुंटखानावर कारवाई करत तिघांना अटक केली. या सर्व आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना 22 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सोनावण्यात आली. 

शाहूपुरी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सदरची कारवाई केली. मात्र या कारवाईनंतर न्यू शाहूपुरी तसेच अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांमधून आणि शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे. कारण कोल्हापुरात प्रवेश करतात एस.टी. स्टँड परिसर तसेच रेल्वे स्टेशन परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला तसेच त्यांच्या भोवतीने घुटमळणारे नशेबाज हे थव्याच्या थव्याने दिसत होते. पोलीस स्टेशनच्या समोरच संपूर्ण अनैतिक व्यापार शहरवासीय उघड्या डोळ्याने रोज बघत होते. आजच्या कारवाईने किमान काही दिवस या संपूर्ण अनैतिक प्रकाराला आळा बसेल अशी आशा शहरवासीयांना वाटत आहे. नूतन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित तसेच अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनी काही दिवसांपासून हॉटेल, लॉजिंग तसेच कॅफे शॉप च्या नावाखाली सुरू असलेला अनैतिक व्यापार बंद करण्याचे हेतूने धाडसी कारवायाला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग आज शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या शाहूपुरी पोलिसांनी अगदी हाकेच्या अंतरावरील रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या गोकुळ हॉटेल समोर वेश्याव्यवसाय करणाऱ्या कुंटखाण्यावर धाड टाकून कारवाईचा बडगा उभारलाय या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले, तसेच अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने करण्यात याव्यात आणि सदरचा अनैतिक व्यवसाय कायमचा बंद करण्यात यावा अशी चर्चा- वजा मागणी शहरवासीयांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments