Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करा : पांडुरंग जवळ

 जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करा : पांडुरंग जवळ 

-----------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------

सविस्तर:-मेढा येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात  गावातील नागरिकांची, व्यापाऱ्यांची अधिकृत रितीने दारू सुरु करण्यासाठी आवाजी व हात उंचावून शासनमान्य दारू दुकाने चालू करणेसाठी ठराव करण्यात आला.  

  या बैठकीच्या ठरावाला सूचक म्हणून मेढयाचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ होते. तर अनुमोदन  दत्तात्रय पवार यांनी दिले.

पांडुरंग जवळ यांनी जो पर्यंत अधिकृत दारू दुकाने सुरू होत नाहीत तोपर्यन्त गप्प बसणार  नाही असा पवित्रा घेतला.

         या बैठकीला 

पांडूरंग जवळ, कांतीभाई देशमुख, दत्ता पवार, सौरभ शिंदे,रवि परामणे, संजय गाडे, संदीप परामणे, मश्चिंद्र क्षीरसागर,नारायण देशमुख,शिवाजीराव देशमुख, तुकाराम धनावडे, विकास देशपांडे, सचिन करंजेकर, सचिन जवळ, आदींनी अधिकृत दारूदुकाने चालू व्हावी यासाठी आग्रही भुमिका मांडण्यात आली.

      सौरभ शिंदे म्हणाले, गेली १५ वर्ष दारु दुकाने बंद आहेत. त्यातून अवैध दारू विक्रेते जास्त फोफावल्यामुळे दारूबंद करण्याचा उद्देश सफल झाला नाही. तर बाजारपेठा ओस पडू लागल्या त्यामुळे मेढा,कुडाळ,करहर ही मार्केटची ठिकाणे सांय.९च्याऎवजी ६वा. बंद होऊ लागली आहेत. मग आपण ५ वर्ष शासनमान्य दुकाने चालू करून काय फरक जाणवतो ते पाहू या. पांडूरंग जवळ म्हणाले, शासनमान्य दारूदुकाने चालू झाली तर तालुक्याच्या ठिकाणाला पहिल्या सारखे वैभव प्राप्त होईल. कुणाला तरी फुकटची प्रसिद्ध मिळावी म्हणून कसल्या प्रकारचा आव आणू नये स्वतःच्या गावातील अवैध दारूबंद करावी मग इतरांच्याकडे बोटे दाखवावी.आता माघार न घेता जोपर्यंत आधिकृत दारू दुकानेचालू होत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच ठेवणार आणि त्यासाठी ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी एकत्रित एऊन लढा द्यावा असे आवाहन केले. या मिटींगला मेढा तसेच मेढा विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दारू विक्री अधिकृत रित्या सुरू व्हावी यासाठी ही पहिली मिटिंग असली तरी लोकांनी तोबा गर्दी केली होती या मिटिंगने परिसरातील दारू दुकाने लवकर सुरू करावी अशी चर्चा सगळीकडे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे तर मद्यपान करणारे लोक अधिकृत दारू दुकाने चालू होण्याची वाट पाहत असल्याचे पाहवयास मिळत आहे या मिटिंगचे  प्रास्ताविक शशिकांत गुरव यांनी केले तर आभार नारायण शिगंटे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments