Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

चॅप्टर केसमध्ये संशयिताला दणका.

 चॅप्टर केसमध्ये संशयिताला दणका.

------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

किरण अडागळे 

------------------------------------------------

सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी व शांतता राखण्यासाठी चांगल्या वर्तणूकीबाबत (चॅप्टर केस) विषेश कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सातारा यांच्या न्यायालयात प्रस्ताव सादर करण्यात येतात. या बंध पत्रातील अटी व शर्ती यांचा भंग केल्याप्रकरणी एका संशयिताला न्यायालयाने दुहेरी दणका दिला. यश‌ संतोष शिवपालक,वय 19,‌राहणार लक्ष्मी टेकडी , सदरबझार सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी त्याच्याकडुन शांतता राखण्यासाठी पोलिसांनी बंध पत्र घेतले होते. या केसची सुनावणी न्यायालयात चालू असतानाच शिवपालक याने‌ बंध पत्रातील अटी व शर्ती यांचे उल्लंघन केले. त्याच्या वर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर बंध भंग केल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला.बंध पत्राचा भंग केल्याचा पुरावा , तसेच शिवपालक यास जामीन अगर दंड भरण्यास संधी देऊनही तो जामीन सादर करण्यास असमर्थ ठरल्याने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान सन 2022- मध्ये 941 जणांचे न्यायालयाने अटी व शर्ती सह बंध पत्र घेतले. ज्यांनी या बंध पत्राचे उल्लंघन केले त्याच्या कडून न्यायालयाने 1,10,000 रूपये दंड वसूल केला आहे. तसेच काही जणांची रवानगी कारागृहात केली आहे

Post a Comment

0 Comments