Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस हवालदार कोळेकर यांचा करवीर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने सत्कार

 कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस हवालदार कोळेकर यांचा करवीर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने सत्कार.

गुरुवारी सायंकाळी तावडे हॉटेल परिसरामध्ये एक कार चालवत असताना चालक अचानक बेशुद्ध पडला. यावेळी कार मध्ये असलेल्या त्याच्या पत्नी जिवाच्या आकांताने रडत व ओरडत होत्या. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार कोळेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना कार चालवत एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी कोळेकर यांचे आभार मानत कृतन्यता व्यक्त केली.

  करवीर शिवसेनेच्या वतीने कोळेकर यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, कोळेकर हे खरे खाकी वर्दीतील देवमाणूस आहेत. अशाच कर्त्यव्यदक्ष अधिकाऱ्यांची देशाला गरज आहे. असे गौरवओद्गार काढले. 

उंचगाव प्रमुख दीपक रेडेकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

 यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर,शरद माळी, दिपक पोपटाणी, दीपक अंकल, जितेंद्र कुबडे, संजय काळूगडे, किशोर कामरा, कैलास जाधव, योगेश लोहार, अजित चव्हाण, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटिळक आदी शिवसैनिक व तावडे हॉटेल रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments