Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

चंदगड शिक्षक संघाच्या सामाजिक संवेदनशीलतेचे अनोखे दर्शन धनगरवाड्यावर लहानग्यांसोबत साजरी केली नागपंचमी.

 चंदगड शिक्षक संघाच्या सामाजिक संवेदनशीलतेचे अनोखे दर्शन धनगरवाड्यावर लहानग्यांसोबत साजरी केली नागपंचमी. 

-------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------

कोवाड (ता.चंदगड) शिक्षक संघाने कानूर व पुंद्रा धनगरवाड्याना भेट देऊन त्यांच्यासमवेत नागपंचमी साजरी केली. कानूर (ता.चंदगड) येथे कोषाध्यक्ष संदीप म्हाडगुत व ज्येष्ठ मार्गदर्शक आनंद जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्याना सामाजिक मदत करण्यात आली. दुर्गम, जंगली व धोकादायक रस्त्यावरुन चालत प्रवास करत शिक्षक संघाची टीम धनगरवाड्यावर पोहचली. दुपारी १ वाजता मुलांनी रानफुलांच्या साक्षीने या टीमचे स्वागत केले. झोपडीत भरणाऱ्या शाळेचे एका स्लॅबच्या शाळेत रुपातंर करणाऱ्या व दिव्यांग असून इतक्या दुर्गम शाळेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आदरणीय गडदाकी यांच्या लक्षवेधी फलक लेखनाने शाळा कमिटीच्या व मुलांच्या स्वागताने सारे भारावून गेले.

शिक्षक संघाच्या टीमने दोन्ही धनगरवाड्यावरील सर्व  इ. १ली ते ७वी अशा १५ मुलांना वह्या, चित्रकला वहया,  रंगपेटी, पेन, पेन्सिल, १५ किलो फराळ, लाडू, स्वीट देऊन त्यांच्यासोबत नागपंचमी साजरी केली. त्याचबरोबर गाणी, गप्पा-गोष्टी केल्या करत दोन्ही धनगरवाड्याच्या अडचणी, संघर्ष समजून घेतला. भविष्यातही या सर्वांच्या पाठीशी सामाजिक, शैक्षणिक बाबतीत पाठिशी रहाण्याची हमी शिक्षक संघाच्या वतीने दिली.

प्रतिकुल परिस्थितीतही स्वतःच्या अस्तित्वाची छाप उमटवणाऱ्या या निसर्गबांधवाकडून खूप प्रेरणादायी विचार व जगण्याच्या संघर्ष कसा करावा याची शिकवण  मिळाली. शिक्षक संघ चंदगडचे अध्यक्ष सदानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनोहर नाईक, अनंत धोत्रे, पुंडलिक बिर्जे, महेश जांबोटकर, संदीप डोंगरे, सचिन शिरगांवकर, दयानंद पवार, शाहू पाटील या उपक्रमात सहभागी होते.

Post a Comment

0 Comments