Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भेंडवडे येथील स्वाभिमानीच्या अध्यक्षावर प्राणघातक हल्ला.

 भेंडवडे येथील स्वाभिमानीच्या अध्यक्षावर प्राणघातक हल्ला.  

 भेंडवडे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष  सुनील जिनपाल देसाई  (वय 50) यांच्यावर भेडवडे मध्ये राहणाऱ्या कुमार कचरे याने देसाई यांच्या घरात जाऊन त्यांच्या एक हात, मान,  आणि डोक्यावर  विळयाने वार करून  गंभीर जखमी केले. आणि त्याने तिथून पलायन केले.  अत्यावश्य अवस्थेत सुनील देसाई यांना पेटवडगाव इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.  ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.

हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे इथल्या जैन गल्ली मध्ये सुनील जिनपाल देसाई सहकुटुंब राहतात.  शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान याच गावातील कुमार कचरे या व्यक्तीने देसाई यांच्या घरात घुसून त्यांच्या हातावर, मानेवर आणि डोक्यावर विळयाने सपासप वार केले.  यामध्ये त्यांचा डावा हात पूर्णपणे तुटला असून डोक्यावर आणि मानेवर वर्मी घाव बसला आहे.  अचानक घडलेल्या घटनेमुळे देसाई यांच्या घरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा केल्याने कचरे हा तेथून पळून गेला.  देसाई गल्लीतील लोकांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या नातेवाईकाच्या घरात त्याला पकडून ठेवले.  या घटनेची माहिती पेटवडगाव पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानी जखमीला तात्काळ पेटवडगाव इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर  आरोपीला संशयित ताब्यात घेतला आहे.  ही घटना नेमकी का घडली याचे कारण अजूनही समजले नसून घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.

Post a Comment

0 Comments