Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बोरगाव पोलिसांनी दरोड्यातील गुन्हेगारांना पकडून मुद्देमाल परत मिळवून दिला.

 बोरगाव पोलिसांनी दरोड्यातील गुन्हेगारांना पकडून मुद्देमाल परत  मिळवून दिला. 

सातारा: काशीळ गावाच्या हद्दीत एन.एच.4 हायवे रोडवरून बोलेरो गाडी क्रमांक MH 43 BP 8427 ही जात असताना, इन्होवा कार क्रमांक MH-06.BM.3715 मधील चालकाने गाडी आडवी मारून,गाडी थांबवुन इन्होवा कार मधून अनोळखी इसम उतरून व मोटर सायकल वरून आलेल्या अनोळखी इसमांनी फिर्यादी संतकुमारसिंग पुरणसिंग परमार व साक्षीदार गोलुसिंग दिनेशसिंग परमार यांच्या तोंडावर स्प्रे चा फवारा मारून त्याच्या ताब्यातील बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MH.43. BP.8427.ही गाडी जबरदस्ती घेऊन जाऊन त्या मधील सतरा लाख बासष्ट हजार रुपये, एकुण 110 ग्राम सोन्याचे दागिने व 17 किलो चांदीचे दागिने असलेल्या कुरियर पार्सल बॉक्स जबरदस्तीने चोरून नेहेल्याबाबत फिर्यादी  संत कुमारसिंग पुरणसिंग परमार वय 25 वर्षे व्यवसाय ड्राइवर मूळ राहणार जारगा, तालुका बसेडी, जिल्हा धोलपूर, राज्य- राजस्थान. सध्या राहणार 216 भेंडीगल्ली, शिवाजी चौक कोल्हापूर यांनी बोरगाव पोलीस ठाणेस गु.रजि.नं.200/2023. भा.द.वि.कलम 395,341,336, प्रमाणे तक्रार दाखल केली होती. सदर गुन्ह्यातील अनोळखी 9आरोपिंचा सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तैलतुबडे व डी. बी.पथक,स्था.गु.शा.सातारा यांनी गुन्हा घडले पासून गुन्हा उघड करण्याच्या अनुषंगाने गोपनीय बातमीदारांना सतर्क करून गुन्हेगारांच्या मागावर होते. आरोपीनची गोपनीय माहिती मिळाल्या नंतर त्यांना सापळा लावून ताब्यात घेतले. आरोपिंनी गुन्हा केल्याचे कबुली देऊन आरोपिंचे ताब्यातून चोरीस गेलेला माल 19,84,255 /- रु. किंमतीची 127ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व 18.700 कि ग्राम चांदीचे दागिने हा उद्देमाल हस्तगत करून गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आला होता. सदरचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर फिर्यादी संतकुमारसिंग पुरनसिंग परमार व साक्षीदार राजकिशोर मास्टर सिंग परमार रा. रैवियापुरा ता. बसेडी. जि.धोलपूर. राज्य राजस्थान.सध्या रा. 216, भेंडीगल्ली, शिवाजी चौक, कोल्हापूर. यांना परत करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा.श्री समीर शेख सातारा, मा.श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा मा. किरण कुमार सूर्यवंशी पोलीस उप अधीक्षक सातारा शहरविभाग सातारा, मा. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्था.गुन्हे शाखा सातारा यांच्या मार्गदर्शना खाली रवींद्र तैलतुबडे, सहायक पोलीस निरीक्षक, पो.कॉ.विशाल जाधव, मुद्देमाल कारकून म.पो. ना.नम्रता जाधव, मोना निंबाळकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments