Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गणेश उत्सव काळात सर्व नियमांचे पालन करून उत्सव शांततेत पार पाडावा.अर्जुन घोडे पाटील

  गणेश उत्सव काळात सर्व नियमांचे पालन करून उत्सव शांततेत पार पाडावा.अर्जुन घोडे पाटील

गणेश उत्सव काळात सर्व नियमांचे पालन करून उत्सव शांततेत पार पाडावा.

त्याचबरोबर डॉल्बी सह लेसर शोला कोणतीही परवानगी मिळणार नाहीं असे परखड मत गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी व्यक्त केलं. ते उचगाव इथं आयोजित गणेश उत्सव मंडळाच्या बैठकीत बोलत होते.

  करवीर तालुक्यातील उचगाव इथल्या मंगेश्वर मंदिरामध्ये  सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते,  आणि लोकप्रतिनिधीची गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने बैठक आयोजित केली होती.  यावेळी गणेश उत्सवा संदर्भात माहिती देताना गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील म्हणाले की यंदा लेझर शो आणि डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही.  त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकी ही चार वाजता सुरू होऊन रात्री बारापर्यंत शिस्तबद्ध संपवण्याची सूचना यावेळी  त्यांनी केली.

 यावेळी लोकप्रतिनिधीसह विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उचगाव गावची लोकसंख्या 45000 च्या आसपास असून या ठिकाणी सुमारे 70 सार्वजनिक मंडळाच्या बरोबरच घरगुती गणेश उत्सव ही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरगुती गणपती विसर्जनाच्या दिवशीच मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन मिरवणूक ही एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात निघते. त्यामुळे विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते.  त्यामुळे विसर्जनासाठी मध्यरात्री दोन पर्यंत ची वेळ वाढवून द्यावी, तसेच ध्वनी मर्यादा पाळून दोन टॉप दोन बेस लावण्यासाठी परवानगी द्यावी, मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी टोकन पद्धतीचा अवलंब करावा,  यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 यावेळी सरपंच मधुकर चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र चौगुले, दीपक रेडेकर, सुरज पाटील, अजित पाटील, करण यादव,  अमर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी उपसरपंच विराग करी,  ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील, रमेश वाईंगडे,अरविंद शिंदे, राहुल  मोळे, विनायक हावळ, फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष वसंत मोरे, गुरुदेव माने, पोलीस पाटील स्वप्निल साठे,दत्ता यादव,विजय गुळवे,यांच्यासह विविध मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments