Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आंतरराष्ट्रीय प्लास्टीव्हीजन इंडिया 2023 प्रदर्शनातून नविन उद्योग - रोजगाराच्या व्यापक संधीचा लाभ घ्यावा -चेतन नरके.

 आंतरराष्ट्रीय प्लास्टीव्हीजन इंडिया 2023 प्रदर्शनातून नविन उद्योग - रोजगाराच्या व्यापक  संधीचा लाभ घ्यावा  -चेतन नरके.

    

---------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

राजू मकोटे

-----------------------------------------------

कोल्हापूर - बदलत्या काळाची गरज ओळखून आंतरराष्ट्रीय प्लास्टिव्हिजन इंडिया प्रदर्शनातून नवनवीन रोजगार आणि उद्योगाच्या संधी व्यापक प्रमाणात उपलब्ध होत आहेत , उद्योजक आणि  युवक त्याचा नेमके पणे लाभ घ्यावा असे आग्रही प्रतिपादन करत आपल्या शुभेच्छा गोकुळ संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केल्या .द ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या वतीने मुंबई गोरेगाव येथील बॉम्बे बिझनेस सेंटर येथे प्लास्टिक व्हिजन इंडिया 2023 हे बारावी प्रदर्शन भरत आहे येत्या दिनांक 7 ते 11 डिसेंबर दरम्यान संपन्न होणाऱ्या या प्रदर्शनाच्या माहितीसाठी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील प्लास्टिक उद्योजकांच्या उद्योजकांचा स्नेह मेळावा हॉटेल पॅव्हेलियन  सभागृहात संपन्न झाला यावेळी ते बोलत होते .                             प्रारंभी सर्वांचे स्वागत करताना रिलायन्स इंडस्ट्रीज चे सत्यजित भोसले यांनी ' तीसहून अधिक परदेशातील प्रतिनिधी सह देशभरातील किमान अडीच लाख व्यवसायिक - नागरिक  या प्रदर्शनास  भेट देतील ,  जगातील हे पाचव्या क्रमांकाचे प्रदर्शन आहे , त्यांचा सर्वानी वेळ काढून भेट देत भेट घावी यासाठीच हा माहिती मेळावा आयोजित केला आहे 'असे नमूद केले . यावेळी  प्लास्टीव्हीजन प्रदर्शनाच्या  माहितीपत्रकाचे अनावरण गोकुळ संचालक चेतन नरके सह महाराष्ट्र महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, अरुण नरके संयोजक सचिव मुकेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले .या प्रदर्शनाची सविस्तर माहिती प्लॅस्टिव्हिजनचे मुख्य समन्वयक रवी जेस्नानी यांनी पॉवर पॉईट प्रेझेंटेशनने  दिली .  ते म्हणाले कि  'प्लॅस्टिक विश्वाच्या विविध पैलूंनी उद्योग विकास वाढीसाठी या पॉस्टीव्हीजन इंडिया -  2023 विविध दालने या  असणार आहेत . यामध्ये मुख्यत्वाने वैद्यकीय औद्योगिक क्षेत्रात संशोधनाचा प्लास्टिकचा वापर - प्लास्टिकची शेती अवजारे आणि त्याचा वापर -  टाकाऊतून टिकाऊ प्लास्टिक आणि या क्षेत्रातील संशोधन योजना अशी विभाग या प्रदर्शनात असणार असून त्याचा युवा वर्ग - संशोधक - व्यावसायिक सह  सर्वांना मोठा लाभ होणार आहे . हे प्रदर्शन केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया सह उद्योग आंतरराष्ट्रीय खाती - स्टार्ट अप इंडिया  आदी विविध  विभागाशी  संलग्न आहे त्यामुळे ती सर्व यंत्रणाही या प्रदर्शनाला पूरकपणे काम करत आहे ' त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आहवान त्यांनी केले.  नाविण्याचा ध्यास आणि बदलत्या काळाची गरज ही उद्योग व्यवसायासाठी नेहमीच गरजेचे असते आणि या प्रदर्शनातून त्याची परिपूर्ती होईल असा विश्वास व्यक्त करत ललित गांधी यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या .  शेतीपूरक उद्योगासाठी प्लास्टिकचा असा सकारात्मक वापर करता येईल या संदर्भाने या प्रदर्शनातून नेमकी माहिती सर्वांनी मिळावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली . यंदाच्या पावसाळी मोसमात आतापर्यत सरासरी  कमी पाऊस पडला आहे , भविष्यातील पावसाचे अनियमित वेळापत्रक असणार असल्याचे तज्ञांनी गांभीर्याने सुचित केली आहे या पार्श्वभूमीवर ठिबक सिंचन आगामी काळात सर्वच शेती साठी गरजेचे ठरणार आहे, त्या संदर्भाने ही या प्रदर्शनात योग्य मार्गदर्शन प्रात्याक्षिकासह विविध स्टॉल मधून मिळेल असे नमूद करत सर्वांचे आभार समन्वयक रिलायन्स इंडस्ट्रीज चे सत्यजित भोसले यांनी मांडले . या प्रदर्शनाचे समन्वयक  मुकेरा शहा - विनोद ओझा - सिद्धार्य शहा आदी सह उद्योग विश्वातील मान्यवर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक - व्यापारी यावेळी उपस्थित होते . त्यांनी सदर प्रदर्शनस उपस्थित राहण्याचा मनोदय ही यावेळी व्यक्त केला .

Post a Comment

0 Comments