Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिरोली येथे वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला.

 शिरोली येथे वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला.--------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------

आठ दिवसापूर्वी व्यवसायाच्या रागातून झालेल्या वाद मिटवण्यासाठी आलेल्या ११ जणांच्या टोळीने  हत्याराने वार करून दोघांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला हि घटना शनिवारी रात्री उशीरा शिरोली पुलाची सांगली फाटा येथील हाॅटेल प्रसादच्या पार्किंग परिसात घडली असून याबाबतची फिर्याद जखमी विकी आप्पासो सनदे यानी शिरोली पोलिसात दिली आहे .

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील जखमी विकी सनदे व श्रीकांत तानाजी मोहिते यांची आठ दिवसापूर्वी झालेला वाद मिटविण्यासाठी सनदे व मोहिते यानी यातील आरोपी विनायक सुकुमार लाड ( कोळी ) याला फोन करून बोलावून घेते त्यावेळी त्याच्यासोबत आलेल्या

अनिकेत सुकुमार लाड [कोळी] , श्रीकांत कोळी , पृथ्वीराज यादव , शुभम यादव , आशिष वाडकर , राहूल आयवळे , आदिनाथ यादव , मनिष कुरणे , रुपेश काबंळे , अजय काबंळे सर्व रा शिरोली पुलाची ता.हातकणंगले यानी वाद मिठवण्या ऐवजी वादाच्या ठिणगीने भडका होवून वाद विकोपाला गेला याने वाद मिटविण्यासाठी आलेल्या आकरा जणांनी सनदे व मोहिते यांच्यावर एडका  धारधार  हत्यार व लाॅनचाक हत्याने वार करून त्याना लाथाबुक्यानी मारहाण करून जखमी केले या घटनेची माहिती मिळताच शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यानी घटनास्थळी धाव घेवून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासून या घटनेत कोणते हत्यार किंवा अन्य हत्याराचा वापर करण्यात आला याबाबत शोध घेतला या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे

Post a Comment

0 Comments