जात धर्म बघून प्रेम करू नका असा स्टेट्स ठेऊन शिरोली येथे प्रेमी युगलाची आत्महत्या .

 जात धर्म बघून प्रेम करू नका असा स्टेट्स ठेऊन शिरोली येथे प्रेमी युगलाची आत्महत्या .


-------------------------------------------------------------------------

 -------------------------------------------------------------------------

शिरोली प्रेमी युगलाची आत्महत्या.

लग्नाला विरोध होत असल्याने शिरोली इथल्या अल्पवयीन 19 वर्षीय अरबाज शब्बीर पकाले आणि सतरा वर्षीय सानिका नानासो निकम या प्रेमी युगलान दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी आठच्या दरम्यान उघडकीस आली.

हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या रेणुका नगर मध्ये अरबाज शब्बीर पकाले हा आपल्या आई-वडिलांच्या सह राहत होता. त्याच गल्लीमध्ये सानिका नानासो निकम ही सुद्धा कुटुंबासह राहत होती. अरबाज आणि सानिका यांचे गेल्या दोन वर्षापासून प्रेम संबंध होते.  सानिका ही इयत्ता अकरावी मध्ये शिकत होती तर अरबाज हा दहावीनंतर बोअरवेल गाडीवर कामाला जात होता. यांच्यातील प्रेम संबंधाची कुणकुण सहा महिन्यापूर्वी सानिकाच्या घरात लागल्यानंतर त्या कुटुंबाने ताकीत देऊन सानिकाला कॉलेजला जाण्याचे बंद केले होते. त्यानंतरही दोघांचा संपर्क होत होता. आज पहाटे सानिका घरातून बाहेर गेली. पण ती बाथरूमला गेली असेल असे वाटल्याने त्याकडे कोणी लक्ष दिले नाही.  सानिकांने थेट अरबाज च्या घरी गेली.  त्या दोघांनीही दुसऱ्या मजल्यावरील खोलीत प्रथम फिनेल प्राशन केले आणि त्यानंतर एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली.  आत्महत्या करण्यापूर्वी मिस यु जान लोग , जात धर्म बघू। प्रेम करू नका , असा मोबाईलवर स्टेटस लावून आत्महत्या केली होती. ही घटना आज सकाळी आठच्या दरम्यान निदर्शनास आली.  स्थानिक नागरिकांनी दुसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर मृतदेह लटकत असल्याचे दिसले.  या घटनेची माहिती शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी हे पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.  करवीर डीवायएसपी संकेत गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.  दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सी पी आर मध्ये पाठवण्यात आले होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.