Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आय एस एस ओ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये संजय घोडावत केंब्रिज स्कूलचे घवघवीत यश.

आय एस एस ओ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये संजय घोडावत केंब्रिज स्कूलचे घवघवीत यश.

--------------------------------

जयसिंगपूर/प्रतिनिधी

--------------------------------

इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत सन 2023 24 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन प्रोमेथस इंटरनॅशनल स्कूल, नोएडा, दिल्ली या ठिकाणी दिनांक 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या दरम्यान केले होते. या स्पर्धेसाठी संपूर्ण देशातील इंटरनॅशनल स्कूलमधील विदयार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 

        14, 17 व 19 अशा वयोगटातील विविध खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा याठिकाणी पार पडल्या. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी रायफल शूटिंग, स्विमिंग, बुद्धिबळ या स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले. त्याचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे

खेळ प्रकार रायफल शूटिंग-  1 रियान घारपुरे सिल्वर मेडल 14 वर्षे वयोगट

2 समवेद सावित्री ब्रांझ मेडल 14 वर्षे वयोगट

खेळ प्रकार स्विमिंग - 

 1 विश्वजीत पाटील ब्रांझ मेडल 19 वर्षे वयोगट

2 फ्री स्टाइल रिले 14 वर्षे वयोगट मुले ब्रांझ पदक सहभागी मुले - तनिष भाटी, अर्जुन गिरीगोसावी, देवांश जव्हेरी, पार्श्व ओसवाल 

खेळ प्रकार बुद्धिबळ - 1 शौर्य बगाडिया गोल्ड मेडल 14 वर्षे वयोगट 

2 अनुष्का राठी ब्रॉन्झ मेडल 14 वर्षे वयोगट मुली या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक श्री अमित अनंतवाड(शूटिंग), श्री. निवास साळुंखे(स्वीमिंग), श्री. श्रीधर तावडे(बुद्धिबळ) व क्रीडा संचालक श्री विठ्ठल केन्चेनावर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल संस्थापक श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले व संचालिका- प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी यशस्वी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments