Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जालना जिल्ह्यातील अंतराली सराटी गावातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्याचे व गोळीबाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत सातारा बंदला मेढ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.

 जालना जिल्ह्यातील अंतराली सराटी गावातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्याचे व गोळीबाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत सातारा बंदला मेढ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.

मेढा,ता.०४: जालना जिल्ह्यातील अंतराली सराटी गावातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्याचे व गोळीबाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत असून सोमवार (दि.०३ सप्टेंबर) रोजी याप्रकरणी सातारा जिल्हा बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली होती. यावेळी जावलीचे मुख्यालय असलेल्या मेढा शहरात सुद्धा बंदला व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मेढ्यात रास्ता रोको आंदोलन करत तहसीलदार व स.पो.नि यांना निवेदन देण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी 

येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु होते. मात्र या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. याचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटत असून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने, मोर्चे सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सातारा  बंद ची हाक देण्यात आली होती. याला जावली तालुक्यातून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला असून मेढा शहरात नागरिक व व्यापाऱ्यांनी या बंदला उत्फुर्त प्रतिसाद दिला. 

तसेच यावेळी मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने मेढ्याच्या मुख्य चौकात काही वेळासाठी रास्ता रोको करण्यात आला तसेच यावेळी मराठा आरक्षण मिळावे, सराटी येथील लाठीहल्ल्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे व आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे माघारी घ्यावेत या आशयाचे निवेदन देखील जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर, स.पो.नि. संतोष तासगावकर यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. दरम्यान विलासबाबा जवळ, विश्वनाथ धनावडे, सचिन करंजेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी या आंदोलनात  मराठा समाजाच्या शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता.

फोटो:मेढा: मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार व स.पो.नि यांना निवेदन देताना मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य

Post a Comment

0 Comments