Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हरित अन् विकसित उचगावसाठी मधुकर चव्हाण यांनी केलेले प्रयत्न प्रेरक.

 हरित अन् विकसित उचगावसाठी मधुकर चव्हाण यांनी केलेले प्रयत्न प्रेरक.

झाडाचा वाढदिवस, वृक्षारोपण आणि त्याचे संगोपन व संवर्धन असे उपक्रम राबवून 

हरित अन् विकसित उचगावचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांनी जे प्रयत्न केले ते प्रेरक ठरतात, असे गौरवोद्गार गोकुळ दूध संघाचे संचालक बाबासाहेब चौगुले यांनी येथे काढले. 

उचगावचे लोकनियुक्त सरपंच पैलवान मधुकर चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार समारंभात चौगुले बोलत होते.

एखादे काम हातात घेतले की ते कसे पूर्णत्वास न्यायचे याची कला मधुकर चव्हाण यांच्याकडून कार्यकर्त्यांनी शिकली पाहिजे, असे सांगून चौगुले म्हणाले, की दूरदृष्टी, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी मोठा संघटित विरोध होऊनही माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठबळावर लोकनियुक्त सरपंचपदाचे मैदान मारले.#

माजी सरपंच कावजीबापू कदम यांनी मधुकर चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेतला. माजी ग्रा.पं.सदस्य अश्विनी मधुकर चव्हाण म्हणाल्या की गावच्या विकासासाठी व जनतेच्या प्रश्नासाठी आमचे दरवाजे चोवीस तास उघडे असतात. सरपंचपद बहाल करून जनतेने त्याची पोचपावती दिली आहे. 

मधुकर चव्हाण सत्काराला उत्तर देताना म्हणाले की जनतेने नेहमीच मला प्रेम आणि विश्वास दिला आहे. तो सार्थ करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही.

तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिनकर पोवार यांनी सूत्रसंचालन केले........ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक पाटील-चुयेकर, बजरंग रणदिवे, उपसरपंच यादव, माजी सरपंच गणेश काळे,..... यांची उपस्थिती होती.

मंगेश्वर व्यायाम शाळेच्या प्रांगणात सत्कार सोहळा झाला. नागरिकांनी इतकी गर्दी केली होती संपूर्ण प्रांगण भरून नागरिक रस्त्यावर गर्दी करून उभे होते. चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते..

उचगाव येथे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करताना गोकुळ दूध संघाचे संचालक बाबासाहेब चौगुले. शेजारी सरपंच मधुकर चव्हाण, सौ अश्विनी चव्हाण, कावजीबापू कदम, बजरंग रणदिवे आदी.

Post a Comment

0 Comments