एकात्मिक बाल विकास प्रकल्प,अंतर्गत पोषण माह २०२३ कार्यक्रम संपन्न.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प,अंतर्गत पोषण माह २०२३ कार्यक्रम संपन्न.
-----------------------------------------फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-----------------------------------------
कोतोली (ता. पन्हाळा )येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प, पन्हाळा मधील बिट - कोतोली 1 अंतर्गत कोतोली येथे पोषण माह 2023 अंतर्गत मा. संतोष पाटील सो मुख्य कार्यकारी अधिकारी, मा शिल्पा पाटील मॅडम जिल्हा कार्यक्रम अधिकारी, मा नयना पाटील मॅडम बाल विकास प्रकल्प अधिकारी व मा प्रतिभा शिर्के सहाय्यक बाल विकास अधिकारी यांचे मार्गदर्शन खाली बिटस्तरावरील पोषण माहचे उदघाटन कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिट पर्यवेक्षिका सुनंदा कोष्टी यांनी केले. मा डॉ संगिता गराडे मॅडम यांनी महिलांचे आरोग्य व आहार याविषयी मार्गदर्शन केले. मा नयना पाटील मॅडम यांनी सदर कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत माहिती दिली. तसेच या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे पाककृतींचे प्रदर्शन ठेवण्यात आलेते होते. पोषण परी व कड धान्याची रांगोळी ICDS चे सुबक बोधचिन्ह काढून तृण धान्यबाबत जनजागृती केली. सदर कार्यक्रमास कोतोली गावच्या सरपंच मा वनिता पाटील मॅडम तसेच ग्रामपंचायतचे मा सदस्य व सदस्या, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग ,सेविका मदतनीस आणि गावातील महिला उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment