नागाव फाटा येथे भरधाव कंटेनर च्या धडकेत एक जागीच ठार तर एक जखमी.
नागाव फाटा येथे भरधाव कंटेनर च्या धडकेत एक जागीच ठार तर एक जखमी.
----------------------------------------------------------------------------------
आज रविवार दि 3 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 च्या सुमारास भरधाव कंटेनर ने दुचाकी स्वारास जोराची धडक दिल्याने दु चाकी स्वार जागीच ठार झाला,तर एक जखमी झाला आहे.घटनास्थळा वरून मिळालेल्या माहितीनुसार एम एच 46 ए आर 7833 हा मा शारदा रोड लाइन्स चा कंटेनर चालक राजेश मौर्य, रा. सिसवार खुर्द,उत्तरप्रदेश हा मुबई वरून एम एस प्लेट घेऊन तिरुची तमिळनाडू कडे चालला होता.कंटेनर ने जोरदार धडक दिल्याने 10 फूट फरफटत दुचाकी स्वार गेले. हर्षद सुनिल बुद्रुकं वय 19 हा जागीच ठार झाला तर सुजल रामचंद्र बागडे वय 19 हा जखमी झाला.हे दोघेही सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक गावचे आहेत,कामानिमित्त मामाकडे,एम एच 09 बी जी 432 हे या दुचाकीवरून इंगळी,ता. हातकणंगले येथे चालले होते. या घटनेची वर्दी शिरोली एम आय डी सी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी येऊन त्यांनी, पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून सी पी आर ला पाठविण्यात आला.घटनास्थळावरचे दृष्य मन हेलावून टाकणारे होते.अपघातामुळे काहीवेळा वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत केली.पुढील तपास स पो नि पंकज गिरी हे करत आहेत
Comments
Post a Comment