मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीमार राधानगरी तालुका मनसे च्या वतीने निषेध.

 मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीमार राधानगरी तालुका मनसे च्या वतीने निषेध.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेला लाठी मार च्या निषेध म्हणून राधानगरी तालुका मनसे च्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर शासनाचा निषेध करण्यात आला.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना राज्य शासन आंदोलकांवर लाठीमार करण्यात आले ही बाब निंदनीय असून लोकशाहीला धरून नाही या आंदोलकावर अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत ते सर्व गुन्हे त्वरित मागे घ्यावेत व आंदोलनात महिला व मुलांची डोक्यांना लागले आहे व हात पाय सुजले आहेत ही बाब निंदनीय आहे म्हणून राधानगरी तालुका मनसेच्या वतीने शासनाचा निषेध करत आहोत.

मराठा आरक्षण संदर्भात शासनाने योग्य दखल घेऊन व आंदोलकावरील गुन्हे मागे घेऊन मराठा आरक्षण जाहीर करावे जर केलं नाही तर मनसे च्या तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला यासंदर्भाची निवेदन राधानगरी तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसीलदार ऋतुराज निकम यांना राधानगरी तालुका मनसेचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण देण्यात आले.

यावेळी राहुल कुंभार सौ स्मिताली कवडे राजेश पाटील उत्तम चव्हाण प्रशांत सनदी संदीप चव्हाण रोहित कानकेकर अक्षय भोपळे अक्षय पाटील उमेद निले संजय कांबळे इत्यादी तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी हजर होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.