Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वाई नगरपरिषदेला अग्निशमन वाहन हस्तांतरण सोहळा.

 वाई नगरपरिषदेला अग्निशमन वाहन हस्तांतरण सोहळा.

-------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

वाई प्रतिनिधी

कमलेश ढेकाणे

-------------------------------

वाई गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड यांच्या सौजन्याने वाई मध्ये वाई नगरपरिषदेला अग्निशमन वाहन हस्तांतरण केले. याप्रसंगी गरवारे कंपनीचे चेअरमन श्री. वायु गरवारे व त्यांच्या पत्नी मयुरी गरवारे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त वाईचे मा. नगराध्यक्ष अनिल सावंत व सर्व नगरसेवक तसेच वाई पोलीस स्टेशनचे पोलीस उप अधीक्षक भालचिम हेही उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना *मयुरी गरवारे म्हणाल्या, वाई ही एक सुसंस्कृत आणि ऐतिहासिक नगरी आहे. या नगरीच्या सुरक्षेत खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही गरवारे कंपनीच्या वतीने एक अग्निशामक वाईकर जनतेला देत आहोत. याचा आम्हाला आनंद आहे.* त्यानंतर बोलताना चेअरमन वायू गरवारे यांनी वाईच्या जनतेचे खूप खूप आभार मानले. गेले सत्तावीस वर्ष त्यांची कंपनी वाई एम आय डी सी मध्ये सुरू आहे. कंपनीच्या आजवरच्या वाटचालीत वाईकर जनतेचे खूप मोठे योगदान आहे. वाई हे आम्हाला आमचे कुटुंब असल्यासारखेच वाटते. म्हणून कुटुंबाच्या गरजेचा विचार करणं हे माझं कर्तव्य समजून त्याच भावनेने आम्ही वाई च्या गरजेनुसार एक अग्निशामक भेट देऊन एका कुटुंबातील सदस्याचे कर्तव्य पार पाडत आहोत. तसेच एवढेच करून आम्ही थांबणार नाही. अजूनही माझ्या कुटुंबासाठी काही आवश्यकता असेल तर माझ्या परीने त्याची पूर्तता करण्याचा मी प्रयत्न करेन अशी खात्री त्यांनी उपस्थितांना दिली. याप्रसंगी इतर मान्यवर नगरसेवकांनी व मुख्याधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वायू गरवारे साहेबांनी केलेल्या सर्वच लोकोपयोगी कार्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी यापुढेही असेच सहकार्य वाई नगरपालिकेला करावे आशा भावना व्यक्त केल्या. वायू गरवारे यांनी अग्निशामकाची चावी मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांचेकडे सुपूर्द केली. याप्रसंगी नगरसेवक महेंद्र धनवे, प्रदीप चोरगे, भारत खामकर, दीपक ओसवाल, भाजपा माजी अध्यक्ष अजित वनारसे, माजी नगरसेवक प्रदीप जायगुडे, समाजीक कार्यकर्ते अजित शिंदे , गरवारे कंपनीतील अधिकारी व कामगार तसेच वाईकर नागरिक व नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments