Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थिनीला 'बॅड टच नामांकित शाळेतील घटना, शिक्षकाला अटक.

विद्यार्थिनीला 'बॅड टच नामांकित शाळेतील घटना, शिक्षकाला अटक.

मरियम ह्यांद्री जोसेफ

-----------------------------------

अमरावती प्रतिनिधी

सुरेश कपूर 

-----------------------------------

स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकालगतच्या (इर्विन) एका नामांकित शाळेच्या शिक्षकावर कोतवाली पोलिसांनी मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून

विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंदविला आहे. मरियम ह्यांद्री जोसेफ,असे त्या संशयित आरोपी शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्यास रात्रीच ताब्यात घेतले. प्राप्त माहिती नुसार तक्रार करण्याआधी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट शाळा व्यवस्थापनाने सर्वप्रथम आयुक्तालयातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर शुक्रवारी (ता. २२) कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्या शिक्षकाला तत्काळ ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय चाचणी करून घेतली.

प्राप्म माहितीनुसार, शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने संबंधित शिक्षक मरियम ह्याड़ी जोसेफ हा तिला नेहमी 'बंड टच' व शोषण करत असे

कोतवाली ठाण्यात प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी शाळेच्या ३ महिला व ५ पुरुष शिक्षक हजर होते. त्या मुलींनी आपल्या पालकांना सांगितले होते. त्यावरून तिच्या पालकांनी ११ सप्टेंबरला मुख्याधापकाकडे या गंभीर प्रकरणाची तक्रार नोंदवित कारवाईची मागणी केली. त्यानंतर शाळेच्या विशाखा समितीने या प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्याध्यापकानी शुक्रवारी (ता. २२) संबंधित शिक्षकाविरोधात कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली.

तक्रार करण्याच्या अगोदर सरांनी दीली आत्महत्येची धमकी.

प्राप्त माहितीनुसार विशाखा समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर शिक्षकास निलंबित करण्यात आले व पोलिसात तक्रार दाखल करण्याची माहिती त्याला देण्यात आली. त्यावेळी त्याने पोलिसात तक्रार देऊ नका असे म्हणत आत्महत्या करण्याचा देखावा करीत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु शाळेत शिकणाऱ्या ३ हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून त्या शिक्षकाच्या कुठल्याही दबावाला भिक न घालता शाळा प्रशासनाने पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला, मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षक मरियम ह्यांड्री जोसेफ याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ (विनयभंग) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोस्को) कलम ८/१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

Post a Comment

0 Comments