Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जालना मध्ये झालेल्या अत्याचार निषेधार्थ सातारा मध्ये छत्रपती मराठा साम्राज्य (CMS) टीम च्या वतीने निवेदन देण्यात आले व तीव्र निषेध व्यक्त केला.

 जालना मध्ये झालेल्या अत्याचार निषेधार्थ सातारा मध्ये छत्रपती मराठा साम्राज्य (CMS) टीम च्या वतीने निवेदन देण्यात आले व तीव्र निषेध व्यक्त केला.

सातारा:जालना येथे शांततेचा मार्गाने सुरू असलेला मराठा आंदोलनावर अमानुष लाठी चार्ज  केल्या बद्दल जाहीर निषेध आणि कायमस्वरूपी टिकाऊ असे  50% आतील ओबीसी मधून आरक्षण मिळणे बाबत CMS छत्रपती मराठा साम्राज्य संघटने मार्फत प्रत्येक जिल्ह्यात निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त केला आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी राजधानी सातारा मधील CMS टीम ने सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. ह्यावेळी प्रतिक्रिया देताना..........

अतिशय निंदनीय प्रकार.

अतिशय विकृत कृती.

जिचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.

आणि इतका भयानक लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या आदेशानेच होऊ शकतो. आणि झाला आहे.

अतिशय संयमाने,अतिशय संविधानिक पद्धतीने,अतिशय लोकशाही मार्गाने,गांजलेला पिचलेला आणि करोडो रुपये शेताच्या मातित टाकुन दुष्काळाच्या झळा सोसणार्या मराठा समाजाच्या आंदोलनावर अमानुषपणे लाठीमार करणार्या ह्या मोगलाई सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चा निषेध करावा तेवढा थोडा आहे.

अतिशय शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने संविधानिक मार्गानं चालु असलेले आंदोलन काही ही कारण नसतांना.

फक्त आणि फक्त चिरडुन टाकण्याच्या उद्देशाने

.हजारो पोलिसांना घेऊन अश्रूधुराच्या नळ नळकांड्या फोडुन .

 गोळीबार करुन.

हे शांततेत चाललेले आंदोलन अक्षरशः चिरडुंन टाकण्याच्या उद्देशाने हे हजारो पोलिस शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ने एका खेडेगावात चाललेले आंदोलन चिरडुन टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

परंतु या नीच कृतीने हे आंदोलन चिरडले जाणार नसुन जास्तच पेटले जाणार आहे.

आणि अजूनही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सुरू असलेले कोंबिंग ऑपरेशन आणि प्रत्येक घरातून गरीब मराठा बांधवांना सुरू असलेली सरसकट अटक,खोटे गुन्हे,ताबडतोब मागे घेण्यात यावे-नाहीतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील या सरकारला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.


या वेळेस सातारा CMS टीम मधून शैलेश शेडगे , स्वप्नील जाधव ,सूरज गायकवाड, जितेंद्र शीबे ,निवास महाडिक ,ओमकार शेडगे , अभिजित कोठावळे आणि मराठा बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments