Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

1 लाख 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडाधिकारी अटक तर एक दिवसाची पोलीस कोठडी.

1 लाख 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडाधिकारी अटक तर एक दिवसाची पोलीस कोठडी.

---------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------

  1 लाख 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडाधिकारी अटक करण्यात आली असून साखरे याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे याला 1 लाख 10 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली. एका ठेकेदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी करुन साखरेवर सापळा रचत कारवाई केली.

या कारवाईबाबत पोलीस उपअधिक्षक सरदार नाळे म्हणाले ॲल्युमिनियम कंपोझिट पॅनेलवरती प्रिंटशिप तयार करून देण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून झालेल्या कामांची बिले काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे याने 1 लाख 10 हजारांची लाच मागितली होती. त्याबाबतची तक्रार एसीबी कार्यालयात ठेकेदाराने केली.

जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळच्या सुमारास झाली. दरम्यान उच्चपदस्थ अधिकारी लाच घेताना सापडल्याने काेल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

वेगवेगळ्या सरकारी विभागास साहित्य पुरवठा  करण्याचे काम करतात. त्यांनी ऑनलाईन महा टेंडर वरती कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास आवश्यक असलेले साहित्य हे ऑनलाइन महा टेंडर वरती आलेल्या जाहिरातीनुसार पुरवले होते. सदर साहित्याचे एकूण बिल हे 8,89,200/- रुपयचे झाले होते. सदर बिल मंजूर करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे वरील बिल रकमेच्या अंदाजे 15 टक्के प्रमाणे लाच मागणी करून तडजोडीअंती 1,10,000 /-₹ लाचेची मागणी करून ती लाच रक्कम आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी विरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून कोर्टात हजर करण्यात आले. सदरच्या कारवाई मध्ये श्री सरदार नाळे,(पोलीस उप अधीक्षक)

श्री. बापू साळुंखे, पोलीस निरीक्षक, श्री.संजीव बंबरगेकर,श्रेणी पोसई,पोहेकॉ / सुनील घोसाळकर,पोना/सचिन पाटील ,पोकॉ/ मयूर देसाई, पोकॉ/रुपेश माने,पोकॉ/संदीप पोवार,चापोहेकॉ / विष्णु गुरव ला.प्र.वि.कोल्हापूर यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments