Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पंचक्रोशी विद्यालय मालचौंडी च्या जावली तलुका शालेय कबड्डी संघाची तालुकास्तरावर चमकदार कामगिरी...

 पंचक्रोशी विद्यालय मालचौंडी च्या जावली तलुका शालेय कबड्डी संघाची तालुकास्तरावर चमकदार कामगिरी...

-------------------------------------------------------------------
फ्रंटलाइन न्युज महाराष्ट्र
प्रतिनिधी शेखर जाधव
-------------------------------------------------------------------

भणंग ता.०८: पंचक्रोशी विद्यलाय मालचौंडीच्या कबड्डी संघाने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवीत चमकदार कामगिरी केली असून या यशाबद्दल कबड्डी संघाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रविवारी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. यावेळी झालेल्या स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटात मालचौंडी ता. जावली येथील पंचक्रोशी विद्यालयाच्या कबड्डी संघाने चकमदार कामगिरी करित पहिल्या क्रमांकावर बाजी मारत विजेतेपद मिळविले आहे. कबड्डी संघातील विद्यार्थ्यांना हायस्कुलचे मुख्याध्यापक संजय मगरे, विद्यालयातील शिक्षक दयानंद कांबळे, उदय चव्हाण, विशाल पाटसुते, ज्ञानेश्वर कदम, संगीता बर्गे यांचे मार्गदर्शन लाभले.

संघातील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक विद्यालयातील शिक्षक,  शाळा व्यवस्थापन समिती, पंचक्रोशीतील सरपंच व शिक्षण प्रेमी यांनी केले आहे. तसेच जिल्हास्तरावर यशस्वी होण्यासाठी कबड्डी संघाला शुभेच्छा आहेत 

Post a Comment

0 Comments