Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शासनाच्या बळजबरी धोरणाने स्मशानभूमीसाठी नवेगांवकर आक्रमक ◼️ते थेट पोहोचले जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालयात.

 शासनाच्या बळजबरी धोरणाने स्मशानभूमीसाठी नवेगांवकर आक्रमक ◼️ते थेट पोहोचले जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालयात.

---------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

---------------------------------------------

 स्मशानभूमीच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासाठी आमरण उपोषणाची भूमिका घेतली असता शासनाने नवेगावचा महादेव गोरे यांना दिलेला गायरान पट्टा नवेगावच्या स्मशानभूमी साठी रद्द करावा या मागणीवर जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांनी गाव आढावा बैठक तहसील कार्यालयामध्ये घेतली होती.

आढावा बैठकीत नवेगावातील शेतमजूर महिला युवक व युवती यांनी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासमोर 21/1 हा दिलेला पट्टा तात्काळ रद्द करून तिथेच स्मशानभूमी पाहिजे अशी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठाम भूमिका सर्वानुमते मांडली होती 

या अगोदर पट्टाधारक महादेव गोरे हे वरोडा गावचे निवासी असल्याने व नवेगाव हा गट ग्रामपंचायत वरोडा मध्ये असल्याने ग्रामपंचायत सदस्यांना हाताशी धरून सर्वे क्रमांक 58 चा ठराव स्मशानभूमीसाठी कडे तहसीलदार यांच्याकडे दिला आहे .हा ठराव सरपंच आणि उपसरंपच यांनी नवेगाव वासियांना न जुमानता व कोणतीही गाव बैठक न घेता घेतला असून या आढावा बैठकीमध्ये ग्रामपंचायत वरोडा सदस्यांची हजेरी होती.

प्रशासन सुद्धा आपल्या सोयीची बाजू म्हणून गाववासी यांच्या मताला डावलून सर्वे नंबर 58 मध्ये स्मशानभूमी द्यायची अशी भूमिका घेत असल्याचे नवेगाव वासियांना दिसून येत होते. पण सदरहु पट्टा हा मुख्य नवेगाव, बाखर्डी व तळोधी मार्गावर असल्याने शाळेकरी मुले, वर्दळी चा मार्ग असल्याने व जिल्हा परिषद रोडची जागा असल्याने जागेसाठी नवेगांववाशी यांचा विरोध असून शासनाने बळजबरीने येथे स्मशानभूमी दिल्यास गाववासी आमरण उपोषण व तीव्र आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहील असे अप्पर जिल्हाधिकारी यांना गाववासियांनी ठासून सांगितले

सदरहु आढावा बैठकीत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी गाववासीयांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी पुढील निर्णय देईल अशी भूमिका मांडली. दरम्यान आज शुक्रवारी शेंकडों गावकरी मंडळी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्याचे दिसून आले.

सदर घटनेचे नेतृत्व मा. बबन पेंदोर, वनमाला कातकर सरपंच ग्राम पंचायत वरोडा, अमोल निरंजने ,धनराज निरंजने आणि समस्त नवेगाववासीं.

Post a Comment

0 Comments