Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पात्र लाभार्थी एक ही वंचित राहता कामा नये;आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रशासनांस सूचना.

 पात्र लाभार्थी एक ही वंचित राहता कामा नये;आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रशासनांस सूचना.

महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभाग राधानगरीच्या वतीनं शासन आपल्या दारी सेवा महिना शुभारंभ आज पार पडला.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासनाच्या सर्व विभागांनी लोकांपर्यंत जाऊन चांगलं काम करण्याचा संकल्प करण्याचे  आवाहन करत,सर्व पात्र लाभार्थींपर्यंत योजना पोचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन आमदार प्रकाश अबीटकर यांनी केलं.ते राधानगरी येथे ,शासन  आपल्या दारी या ,कार्यक्रमात बोलत होते .

शासन महसूल आणि वन विभाग राधानगरीच्या वतीनं शासन आपल्या दारी सेवा महिना राबवण्यात येत आहे.राधानगरी येथे आमदार प्रकाश अबीटकर यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थींना विविध योजणांचे मंजुरी पत्र,लाभाचे धनादेश वाटप करण्यात आले.यावेळी आमदार प्रकाश अबीटकर यांनी मातोश्री पानंद आणि पालकमंत्री पानंद योजनेतून  गावागावातील पानंदि चांगल्या करण्यासाठी उठाव करूया,शासनाच्या सर्व योजना लाभार्थींपर्यंत पोचवण्यासाठी विभागवार मेळावं घेणार  असल्याचं सांगितलं.

  यावेळी तहसीलदार अनिता देशमुख,राधानगरी तालुका संजय गांधी समितीचे अध्यक्ष अरुण जाधव,गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारी यांनी मनोगत व्यक्त केली.यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्ये,अशोक फराकटे,अभियंता शिवाजी इंगवले,डॉ गणपती गवळी,मंडल अधिकारी सुंदर जाधव,डॉ व्ही बी सरावणे,  संग्राम पाटील,संतोष पाटील,आनंदा शिंदे,मयूर पवार, मिथुन पारकर, फारुख नाळवेकर यांच्यासह लाभार्थी मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments