Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री पाडळेश्वर घटस्थापना नवरात्र उपवास हि भक्तीमय भावना.

 श्री पाडळेश्वर घटस्थापना नवरात्र उपवास हि भक्तीमय भावना.

भणंग ता जावली जि सातारा . भणंग गावचे ग्रामदैवत श्री पाडळेश्वर देव , रत्नागिरीचा ज्योतिबाचे दुसरे रूप ' सर्व गावावर त्यांची कृपा दृष्टी असते म्हणूनच भणंग ग्रामस्थ नवरात्री दिवसी श्री पाडळेश्वराच्या गाभाऱ्यात नऊ रात्र नऊ दिवस सर्व महिला पुरुष एकत्र येऊन नवरात्रीच्या घटाचा उपवास करतात एकत्रच फराळ करतात . प्रेम - भावना आणि श्रध्दा यांचे एकत्रीत मिलन . म्हणजे श्री पाडळेश्वराची कृपादृष्टी अर्शिवाद .

नऊरात्र - नऊ दिवस भक्तीमय भावनेने धरलेला उपवास म्हणजे एक चैतन्य निर्माण करणारी दिश्या . नऊरात्र - नऊदिवस ह्या नऊ दिवसाच्या उपवासाच्या काळात कोणताही थकवा भिति आणि शाररीक आणि मानसिक थकवा न जाणवात नव चैतन्य शरिरात संचार करत असल्याचा भास होत दिव्य स्वप्न साखर झाल्याचा आनंद होतो असे माजी सरपंच सुहास जाधव , हनुमान उदय मंडळाचे माजी अध्यक्ष अविनाश जाधव आणि हनुमान उदय मंडळाचे अध्यक्ष जोतिराम नारायण जाधव व सर्व उपवास कर्ते महिला व पुरुष यांचे मत आहे .

श्री पाडळेश्वर चरणी नऊ रात्र - नऊ दिवस ४४ दिप दिवा तेजत आसतात . आणि सत्तरा उपवास कर्ते उपवास करतात . दरवर्षी उपवास करणार्‍याच्या संखेत वाढ होत असलेली दिसत आहे. ह्या आता युवा पिढीचा ही सहभाग होत असलेला दिसत आहे.

नऊ रात्र नऊ दिवस उपवास झाल्या नंतर दाहव्या दिवशी म्हणजे दसरा उत्सव साजरा केला जातो त्यावेळी भणंग ग्रामस्थ सर्व पुरुष दसर्‍याचे सोन लुटण्यासाठी श्री पाडळेश्वर देवास पालखी घेवून सर्व शिवार्‍यातून फेर फटका मारतात नंतर शेजारील गावातील म्हणजे केसकर वाडी ग्रामस्थ आपले ग्राम दैवताची पालखी घेऊन येतात दोन्ही गावचे ग्रामस्थ एकमेकास अलिंगन देतात व निरोप घेवून आप आपल्या गावातून ग्रामदेवतांची मिरवणूक काढली जाते

Post a Comment

0 Comments